पाली-भूतीवली धरणातील पाणी वाड्यांना..

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


  


आदिवासी वाड्यातील पाणी टंचाई दूर होणार


 


सुधाकर घारे यांच्याकडून कामाला सुरुवात


 


कर्जत,ता.29 गणेश पवार


 


                    कर्जत तालुक्यातील माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी वाड्यांना पाणी मिळत नाही. त्या आदिवासी वाड्यांना वर्षानुवर्षे पाणी टंचाई असून रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी धान्य वाटप करताना 15 दिवसात निर्णय घेऊन पाईप लाईन टाकून घेऊ असे आश्वासन दिले होते.दरम्यान, पाली भूतीवली धरणातील आसल ग्रामपंचायत मधील दुर्गम भागात असलेल्या आदिवासी वाड्यांना पिण्याचे पाणी पोहचविण्यासाठी पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू झाले आहे.


 


                        कर्जत तालूक्यातील दुर्गम डोंगर भागात असलेल्या माथेरानच्या पायथ्याशी वसलेल्या आदिवासी वाड्यावस्त्याची पाणी टंचाई असते.त्या ग्रामपंचायत मध्ये याच महिन्यात रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे हे आदिवासी लोकांना धान्य वाटप करण्यासाठी गेले होते.त्यावेळी आसल ग्रामपंचायत हद्दीतील सागाचीवाडी, भुतीवलीवाडी, बोरीचीवाडी पाली धनगरवाडा,चिंचवाडी आणि धामणदांड, मन्या धनगर वाडा,नाण्यांचा माळ या आदिवासी वाड्या टंचाईग्रस्त वाड्या राहिल्या आहेत.अनेक वेळा निवेदने देउनही पाणी टंचाई दूर होत नव्हती,मात्र जिल्हापरिदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य समितीचे सभापती सूधाकर घारे यांनी त्यावेळी 15 दिवसात पाईप लाईन द्वारे पाणी पोहचवले जाईल असे आश्वासन दिले होते.


 


                     लॉक डाऊन आणि संचार बंदी असतांना देखील आदिवासी लोकांचे काम व्हावे यासाठी मदत व्हावी या उदेशाने पाणीटंचाई दुर करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले. सुधाकर घारे यांच्या प्रयत्नाने पाली भूतीवली धरण ते चिंचवाडी आणि पुढे सर्व वाड्या अशी पाईप लाइन टाकण्याच्या कामास सुरुवात झाली आहे.या सर्व वाद्यांच्या समोर असलेल्या पालभुतीवली धरणातून पाईप द्वारे पाणी उचलून या आदिवासी वाड्यावर पोहचवले जाणार आहे.कायम टंचाई ग्रस्त असणाऱ्या वाड्यामध्ये पाणी मिळणार असल्याने गावकऱ्यांना आणि महिलांची पायपीट काही दिवसात थांबणार असून आसल ग्रामपंचायत मधील वाड्यांना पाणी पोहचणार आहे.


 


 


 


 


 


 


सुधाकर घारे-उपाध्यक्ष रायगड जिल्हा परिषद


 


आपल्याला त्या ठिकाणी गेल्यानंतर आदिवासी लोकांनी प्यायला पाणी दिले आणि सध्या हंडाभर पाण्यासाठी करावी लागणारि पायपीट थांबवावी अशी विनंती केली होती.आपल्याला त्यांची मागणी पूर्ण करता येणे शक्य असल्याने आम्ही तात्काळ कार्यवाही करण्यास सुरुवात केली आहे.त्यांच्या दारात पाणी पोहचावे यासाठी आपला प्रयत्न आहे.


 


 


 


 


 


 


 


 


 


 


Popular posts
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
मनिषा हिला श्रद्धांजलि वाहण्यासाठी राजीव गांधी विचार प्रसारक मंडळ ट्रस्ट,अखिल भारतीय मानव कल्याण समिति, अरविंद शिंदे मित्र परिवारऻच्या वतीने राजीव गांधी वाचनालय,ससुन वसाहत ते डाॅ.बाबासाहेब उद्यान,पुणे स्टेशन पर्यंत कॅन्डल मार्च चे आयोजन
Image
स्त्री शिक्षणाचे जनक, महान क्रांतिकारक, उत्तम उद्योजक,क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले* यांची आज जयंती…  त्यानिमित्त महात्मा फुले यांना *विनम्र अभिवादन !!!*
Image
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image
खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करा*                                        - उपमुख्यमंत्री अजित पवार   * पुणे जिल्हा खरीप हंगाम आढावा बैठक
Image