उषा उर्फ माई ढोरे यांचे नातू कु.ज्ञानेश जवाहर ढोरे याने स्वत:च्या वाढदिवसावर होणारा खर्च टाळून कोरोना (कोविड-१९) रुग्णांवरचे उपचारासाठी निधी रुपात ५१/दान-

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


पिंपरी, (दि.१३ मे २०२०) – पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व संसर्ग लक्षात घेऊन सामाजिक दातृत्वाच्या भावनेने महापौर उषा उर्फ माई ढोरे यांचे नातू कु.ज्ञानेश जवाहर ढोरे याने स्वत:च्या वाढदिवसावर होणारा खर्च टाळून कोरोना (कोविड-१९) रुग्णांवरचे उपचार, त्यासाठीची औषधे आणि इतर सामुग्री अशा सगळ्याच गोष्टींसाठी महापालिकेस एकावन्न हजार रुपये इतक्या आर्थिक देणगीच्या रुपाने मदत दिलेली आहे.


घरातूनच समाजकारणाचे बाळकडू मिळालेल्या कु.ज्ञानेश याने सामाजिक गरज ओळखून कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी आर्थिक मदतीचा हात पुढे करत कुटुंबाचा वारसा पुढेही चालविला आहे. कु. ज्ञानेश याचा १३ वा वाढदिवस होता. त्याने स्वत:च्या वाढदिवशी होणारा अनावश्यक खर्च टाळून कुटुंबियांसमवेत अत्यंत साधेपणाने वाढदिवस साजरा केला. 


सध्या देश आणि जगासमोरचे कोरोना व्हायरसचे संकट हे मानवते समोरचे सर्वांत मोठे आव्हान आहे. त्याच्याविरुद्ध लढण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे ही काळाची गरज लक्षात घेता महापालिकेस देण्यात आलेली आर्थिक मदत प्रशंसनीय असून समाजातील इतरांसमोर आदर्श निर्माण करणारी आहे.


महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील महापौर दालनात आज ज्ञानेश याने महापौर उषा उर्फ माई ढोरे व वडील श्री. जवाहर ढोरे तसेच श्री. गणेश काचे यांच्या उपस्थितीत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. अजित पवार यांच्याकडे आर्थिक देणगीचा धनादेश सुपूर्द केला. ज्ञानेश याने दानशूरतेचा नवा आयाम समाजासमोर उभा केला असून त्याची कृती आदर्शवत आणि अनुकरणीय असल्याचे मत अतिरिक्त आयुक्त श्री. अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केले.


Popular posts
शिवपुत्र राजाराम महाराज 🚩"  शिवाजी महाराजांच्या  तृतीय पत्नी राणी सोयराबाई यांच्या पोटी 24 फेब्रुवारी 16 70 रोजी राजाराम महाराजांचा जन्म झाला .
Image
महाविकास आघाडीचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अरुण लाड व शिक्षक मतदार संघाचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, काँग्रेस भवन मध्ये आज महत्वपूर्ण बैठक संपन्न...
Image
कोव्हिड-१९ इसेन्शिअल एक्सपो २०२०’ची यशस्वी सांगता
Image
बीगॉसची मनीटॅपसह भागीदारी
Image
तरुणांनी राज्यशासन व केंद्राच्या योजनेचा लाभ घेवून उद्योजक बनावे – पी.टी काळे
Image