दुकान टॅक्स पावतीची  अट रद्द करणे संदर्भात.....  

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


मा.आयुक्त/ महपौर साहेब
पिंपरी चिंचवड महानगरपालिका

विषय : दुकान टॅक्स पावतीची  अट रद्द करणे संदर्भात.....
महोदय,
         कोरोना या विषाणूने जगभर लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. आपला देश लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन योग्य प्रकारे कोरोनाशी लढा देत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने सुरक्षिततेचे नियम पाळून दुकाने चालू करण्याचा निर्णय घेतला आहे. .परंतु सध्या लॉकडाउन ची परिस्थिती असल्यामुळे अनेक व्यापारी आर्थिक संकटात आहेत. महानगरपालिकने दुकानाचा टॅक्स भरलेली मार्च २०२० अखेरची झेरॉक्स  देण्याची अट दिलेली आहे. हि अट जाचक असून,शासनाने ३० जून हि कर भरण्यासाठी अंतिम मुदत दिलेली असताना आपण  आर्थिक संकटात सापडलेल्या व्यापाऱ्यांवर अन्याय करत आहात .. त्यामुळे हि अट तात्काळ रद्द करून व्यापाऱ्यांना आपण दिलासा द्यावा हि नम्र विनंती

सदर विषयाचे निवेदन एम आय एम पक्षाच्या वतीने प्रवक्ते धम्मराज साळवे यांनी मा. महापौर याना दिले


आपला विश्वासू


अकील मुजावर          धम्मराज साळवे      संतोष शिंदे
             पश्चिम महा. अध्यक्ष                   प्रवक्ते                                सचिव