पिंपरी चिंचवड शहरात दारूची दुकाने चालून करणेबाबत या विषयाचे पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


पिंपरी चिंचवड शहरात दारूची दुकाने चालून करणेबाबत या विषयाचे पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले
महोदय,         
         
महोदय,
          उपरोक्त विषयांवे सध्या देश व राज्य तसेच पिंपरी चिंचवड शहर हे कोरोनाशी चांगल्या प्रकारे लढा देत आहे.पोलीस सुद्धा दिवसरात्र सुरक्षा देऊन कोरोनाशी लढा देत आहेत. त्याबद्दल आपल्या सर्वांचे करावे तितके कौतुक कमी आहे.
          महाराष्ट्र सरकारने आर्थिक व्यवस्था सुधारण्यासाठी आजपासून दारूची दुकाने चालू करण्याचा निर्णय घेतला आहे.परंतु हा निर्णय अयोग्य असून याचे दुष्परिणाम भयंकर होतील. शासनाने लॉकडाउनचा तिसरा टप्पा जाहीर केला आहे.अनेक गरीब गरजू लोकांचे जीवन मरणाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. परंतु लोंकाना अन्नधान्य देण्याच्या ऐवजी सरकार लोकांना दारू देत आहे.
          पिंपरी चिंचवड शहर  रेड झोन मध्ये आहे दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे दारूची दुकाने चालू करणे हा निर्णय अतिशय चुकीचा  आहे. सरकार स्वताची आर्थिक व्यवस्था सुधारण्यासाठी दारूची दुकाने चालू करत आहे पण गरिबांच्या आर्थिक बजेटच काय ? दारूमुळे घरघुती हिंसाचार वाढण्याची खूप मोठी शक्यता आहे. आपण आतापर्यंत पाहिलं तर लॉकडाउनच्या काळात सर्वाधिक केसेस या घरघुती हिंसाचाराच्या आहेत. मग  दारूमुळे त्यात किती वाढ होईल हे वेगळं सांगायची आवश्यकता नाही .
           पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन पोलीस प्रशासन यांनी आतापर्यंत चांगल्या पद्धतीने नियोजन व निर्णय घेतले आहेत त्या सर्व प्रयत्नावर पाणी पडण्याची शक्यता आहे. आणि पहिल्याच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात सोशल डिस्टन्सचा फज्जा उडालेला आहे. लोकांनी सकाळपासून मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे शेवटी पोलिसांना हि गर्दी हटवावी लागली. सुरवातच अशी असेल तर पुढे काय होईल. पोलिसांनी कोरोनाशी लढायचं का बेवड्यांशी हा आमचा प्रश्न आहे .
      AIMIM पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व  औरंगाबाद लोकसभेचे  खासदार इम्तियाज जलील साहेब यांनी औरंगाबाद या ठिकाणी दारूची दुकाने कोणत्याही परिस्थिती चालू होऊ देणार नाही असा निर्णय घेतला आहे याच निर्णयाची दखल घेऊन पोलीस आयुक्तांनी दारूची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच पार्शवभूमीवर आपण देखील पिंपरी चिंचवड च्या हितासाठी हा निर्णय घ्यावा व दारूची दुकाने बंद ठेवावी हि आपणास नम्र विनंती
        अश्या आशयाचे निवेदन मा. पोलीस आयुक्त याना aimim पक्ष्याच्या वतीने मा.महाराष्ट्र अहसचिव अकील मुजावर प्रवक्ते धम्मराज साळवे महिलाध्यक्ष अंजना गायकवाड व कार्यालयीन सचिव संतोष शिंदे यांनी दिले
        तरी आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रात यास प्रसिद्धी देण्यात यावी हि आपणास नम्र विनंती. .