गुडवणवाडी मध्ये पाण्याच्या बोरिंग वरून हाणामारी... 5 जखमी,17 जणांवर गुन्हा दाखल

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


गुडवणवाडी मध्ये पाण्याच्या बोरिंग वरून हाणामारी... 5 जखमी,17 जणांवर गुन्हा दाखल

नेरळ,ता.13 गणेश पवार

                              कर्जत तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त गुडवणवाडी मध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे.त्यात तेथे असलेल्या बोअरवेलचा हातपंप कोणीतरी तोडला होता.त्याबाबत स्थानिक कोणी आदिवासी व्यक्तीने ग्रामपंचायतच्या सरपंच यांना मोबाईलमध्ये फोटो काढून माहिती दिली.बोअरवेलची माहिती दिल्याबद्दल 17 लोकांच्या जमावाने पाच तरुणांना मारहाण करण्याची घटना घडली.दरम्यान,यात कर्जत पोलीस ठाण्यात 17 व्यक्तींवर गुन्हा दाखल झाला असून पाच जखमींवर कशेळे ग्रामिण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

                             कर्जत तालुक्यातील बोरिवली ग्रामपंचायत मध्ये असलेल्या गुडवणवाडी मध्ये उन्हाळा सुरू झाला की पाणीटंचाई सुरू होते.त्या ठिकाणी असलेल्या आदिवासी लोकांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी डोंगर उतरून खाली यावे लागते.त्यामुळे ग्रामपंचायतने गेल्यावर्षी खोदलेल्या बोअरवेलला चांगले पाणी असल्याने सध्या पूर्वीसारखी पाणीटंचाई तेथे नाही.मात्र असे असताना तेथे असलेल्या बोअरवेलचा हातपंप 12 मे रोजी कोणीतरी तोडला.त्याबद्दल वाडीमधील फोटो काढून बोरिवली ग्रामपंचायतच्या सरपंच वृषाली क्षीरसागर यांनी कळविले. हातपंप तोडला आणि फोटो कोणी काढले याची कोणतीही खात्रीलायक माहिती नसताना केवळ संशयावरून अनंता रामा पुंजारा यांच्या घरात घुसून 17 लोकांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.ही माहिती मिळताच अनंता पुंजारा यांना सोडवण्यासाठी पुढे गेलेल्या सागर निर्गुडा, रोहिदास पुंजारा,पद्ममाकर पुंजारा,पंढरीनाथ निर्गुडे आणि काशीनाथ निर्गुडे यांना देखील लाठी,काठ्या, लोखंडी सळई आणि कोयता यांचा मार खावा लागला.

                               12 मे रोजी सायंकाळी साडे सात वाजता ही घटना गुडवण वाडी मध्ये घडली असून रायगड जिल्हाधिकारी यांचे जमावबंदी आदेश असताना देखील कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.भादवी कलम 143,147, 148,149,452, 324,504, 506,188,आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम चे कलम 37(1)(3) नुसार गुन्हा नोंद झाला आहे.घरात घुसून लाठी काठ्या,कोयता आणि लोखंडी सळई यांनी मारहाण करणाऱ्या सुरेश खंडवी, वासुदेव खंडवी,दीपक खंडवी, नयन खंडवी,लक्ष्मण खंडवी,अनंता खंडवी, कमलाकर खंडवी,जगदीश पारधी,नरेश खंडवी,किरण खंडवी,मोहन पारधी,धनेश पारधी,मंगळ निर्गुडा,विजय निर्गुडा,हरिष खंडवी,आणि सखाराम पारधी अशा 17 जणांवर गुन्हा दाखल असून कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण भोर  सहायक पोलीस निरीक्षक जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार लोखंडे करीत आहेत.