मुंबईत अत्यावश्यक वस्तूंची घरपोच डिलिव्हरी करणार ‘कुटलूट’

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


मुंबईत अत्यावश्यक वस्तूंची घरपोच डिलिव्हरी करणार ‘कुटलूट’


मुंबई, १३ मे २०२०: मुंबईमध्ये ग्राहकांना अत्यावश्यक सामानाची घरपोच डिलिव्हरी करण्यासाठी कुटलूटने पुढाकार घेतला आहे. ग्राहकांच्या अत्यावश्यक गरजा पुरवण्यासाठी या सोशल कॉमर्स मंचाद्वारे सध्या फळे, किराणा सामान, औषधे आणि आरोग्य/वैयक्तिक काळजीच्या वस्तू अशा अत्यावश्यक वस्तू सरकारच्या मार्गदर्शक नियमांनुसार पुरवल्या जात आहेत. या ब्रँडने इंडसफ्रेशसारख्या कंपन्यांशी भागीदारी केली असून ग्राहकांना ७२ तासांच्या आत ताजी फळे आणि भाजी पोहोचवण्यासाठी स्थानिक शेतक-यांशीही हातमिळवणी केली आहे.


जास्तीत जास्त सुरक्षितेची हमी घेण्यासाठी, या मंचाद्वारे विनासंपर्क वस्तू पोहोचवल्या जातात. डिलिव्हरी देणारी व्यक्ती सोशल डिस्टान्सिंगचे नियम पाळत दाराजवळ संबंधित वस्तूंचे पाकिट ठेवतो. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सर्व वस्तू घेतल्या जातात, त्यांचे निर्जंतूकिकरण केले जाते, नंतर त्या पॅक करून डिलिव्हरी करण्यासाठी बॉक्समध्ये पॅक केल्या जातात.


कुटलूटचे सह संस्थापक जस्मीत थिंड यांनी सांगितले की, 'या महामारीत एकत्र येत एकमेकांना आधार देण्याची गरज आहे. आमच्या हायपरलोकल डिलिव्हरी सेवेतच अधिक विस्तार करत, इंडसफ्रेश आणि स्थानिक शेतक-यांशी केलेल्या हातमिळवणीद्वारे ग्राहकांना सुलभतेचा आणि सुरक्षिततेचा अनुभव मिळेल. तसेच आमच्या डिलिव्हरी पार्टनर्सनाही या कठीण काळात उत्पन्न मिळेल.’


Popular posts
किल्ले सिंहगड मोहीम फत्ते*🚩🚩  ४ फेब्रुवारी १६७० रात्री गडावर तुंबळ लढाई झाली
Image
आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या 226व्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन...
Image
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व आमचे नेते युवराज भाऊ बनसोडे यांच्याशी पोलिस हुज्जत घालून
Image
कोलकातामध्ये डावे-भाजपा विद्यार्थी संघटना भिडल्या; दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीमार
स्टार बॉईज स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य हाफपिच क्रिकेट स्पर्धा बोपोडी येथे पारितोषिक समारंभ आयोजित करण्यात आला यावेळेस प्रमुख पाहुणे  मा श्री कैलासदादा गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
Image