पुणे विभागात 30 हजार 887 क्विंटल अन्नधान्याची तर 9 हजार 272 क्विंटल भाजीपाल्याची आवक                               -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


पुणे विभागात 30 हजार 887 क्विंटल अन्नधान्याची तर
9 हजार 272 क्विंटल भाजीपाल्याची आवक
                              -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर


        पुणे, दि. 14 : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 30 हजार 887  क्विंटल अन्नधान्याची तर  9 हजार 272 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे.  विभागात 3 हजार 265 क्विंटल फळांची आवक तसेच कांदा-बटाटयाची आवक 6 हजार 934  क्विंटल इतकी झाली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त                   डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.
            
  पुणे विभागात 13 मे 2020 रोजी 101.260 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 23.946 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.


पुणे विभागात 12 हजार 670 स्थलांतरित मजुरांची सोय
                                      75 हजार 560 मजुरांना भोजन


       सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 125 कॅम्प, कामगार विभागामार्फत 56  कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 14 कॅम्प असे  पुणे विभागात एकुण 195  रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये 12 हजार 670 स्थलांतरित मजूर असून  75 हजार     560 मजुरांना भोजन देण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
0000


Popular posts
तरुणांनी राज्यशासन व केंद्राच्या योजनेचा लाभ घेवून उद्योजक बनावे – पी.टी काळे
Image
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन या दोन दिवशी झेंडा फडकावण्या मध्ये फरक काय
Image
साहेब मी एक  साधा  पत्रकार आहे..* कर्जत माथेरान नेरळ   :  गणेश पवार दै.शिवतेज✍️
Image
स्त्री शिक्षणाचे जनक, महान क्रांतिकारक, उत्तम उद्योजक,क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले* यांची आज जयंती…  त्यानिमित्त महात्मा फुले यांना *विनम्र अभिवादन !!!*
Image
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image