पुणे विभागात 28 हजार 532  क्विंटल अन्नधान्याची तर 7 हजार 489 क्विंटल भाजीपाल्याची आवक                                                       -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


पुणे विभागात 28 हजार 532  क्विंटल अन्नधान्याची तर
7 हजार 489 क्विंटल भाजीपाल्याची आवक
                                                      -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर


        पुणे, दि. 7 : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे  28   हजार  532   क्विंटल अन्नधान्याची तर   7  हजार  489    क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे.  विभागात 2  हजार  661  क्विंटल फळांची आवक तसेच कांदा-बटाटयाची आवक  6  हजार  298  क्विंटल इतकी झाली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.
            
पुणे विभागात 29 हजार  64 स्थलांतरित मजुरांची सोय
1  लाख 8 हजार 664 मजुरांना भोजन


       सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत  159   कॅम्प, कामगार विभागामार्फत 68  कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत  169  कॅम्प असे  पुणे विभागात एकुण  396   रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये  29   हजार   64  स्थलांतरित मजूर असून 1   लाख     8 हजार 664 मजुरांना भोजन देण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.


आरोग्य सेवेसाठी असलेला उपलब्ध साठा 
विभागामध्ये कोरोनाच्या उपचारासाठी अत्यावश्यक असलेला पुरेसा साठा उपलब्ध आहे.  प्राप्त 
माहितीनुसार दि. 04.05.2020 अखेर विभागामध्ये N-95 मास्क ची उपलब्ध संख्या 1,48,054 एवढी आहे. त्याचप्रमाणे PPE kit  51,573  उपलब्ध आहे Triple Layer Face Mask हे 17,95,556 एवढे उपलब्ध आहेत.   
00000