वादळी वाऱ्यात घर कोसळलेल्या दिव्यांग कुटुंबाला 25 हजाराची मदत

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


वादळी वाऱ्यात घर कोसळलेल्या दिव्यांग कुटुंबाला 25 हजाराची मदत

कर्जत,ता.4 गणेश पवार

                 कर्जत तालुक्याच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला होता.

नांदगाव ग्रामपंचायत हद्दीमधील मोहोपाडा येथील दिव्यांग कुटुंबाचे घर कोसळले होते.दरम्यान,त्या भागात पाहणी करण्यासाठी गेलेले जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी स्वतः 25 हजाराची आर्थिक मदत केली.

                कर्जत तालुक्यातील नांदगाव मधील मोहोपाडा येथील दिव्यांग कुटुंब लक्ष्मण कारोटे यांच्या इंदिरा आवास योजनेमधील घर वादळी वाऱ्यात कोसळले. त्यात लॉक डाऊन असल्याने त्यांना कोणताही रोजगार नाही,त्यामुळे घराची झालेली पडझड लक्षात घेता दुरुस्ती करणे देखील आर्थिक दृष्ट्या परवडणारे नव्हते.त्यात या गावात आदिवासी कुटुंबाना धान्य वाटप करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे हे मोहोपाडा गावात गेले होते.त्यावेळी घारे यांना दिव्यांग लक्ष्मण कारोटे आणि त्यांची दिव्यांग पत्नी वैशाली कारोटे यांनी आपली परिस्थिती सांगितली.त्यानंतर घारे यांनी वादळाने कोसळलेल्या घराची पाहणी केली.

              त्यावेळी दिव्यांग कुटुंबाची आर्थिक स्थिती आणि घराची अवस्था लक्षात घेऊन सुधाकर घारे यांनी तात्काळ आपल्या कडे 25 हजार रुपये कारोटे कुटुंबाच्या हातात दिले.त्याचवेळी तेथून गटविकास अधिकारी बाळाजी पुरी यांना फोन करून कारोटे कुटुंबाचे नाव प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये किंवा इंदिरा आवास योजने मध्ये समाविष्ट करण्यात यावे अशी सूचना केली.