पुणे विभागातील 1 हजार 503 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी  विभागात कोरोना बाधित 3 हजार 742 रुग्ण                                               -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


पुणे विभागातील 1 हजार 503 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी 
विभागात कोरोना बाधित 3 हजार 742 रुग्ण
                                              -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर


    पुणे दि.12 :- पुणे विभागातील 1 हजार 503  कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या  3 हजार 742 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 2  हजार 43 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 193 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच  128 रुग्ण  गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
  यापैकी पुणे जिल्हयातील 3 हजार 258  बाधीत रुग्ण असून  1 हजार 358   कोरोना बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  1 हजार 730 आहे. कोरोनाबाधित एकूण 170  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 117 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.  
  सातारा जिल्हयातील 123  कोरोना बाधीत रुग्ण असून 35  बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 86 आहे. कोरोनाबाधित एकूण 2  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 
  सोलापूर जिल्हयातील 299 कोरोना बाधीत रुग्ण असून  72  बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 208 आहे. कोरोनाबाधित एकूण  19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
  सांगली जिल्हयातील 41  कोरोना बाधीत रुग्ण असून 29  बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 11  आहे. कोरोनाबाधित एकूण 1  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
  कोल्हापूर जिल्हयातील  21 कोरोना बाधीत रुग्ण असून 9  बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 आहे. कोरोनाबाधित एकूण  1  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 आजपर्यत विभागामध्ये एकुण 37 हजार 381 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 35  हजार  142 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर  2 हजार 239 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी  31 हजार 367 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून  3  हजार 742 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.  
              आजपर्यंत विभागामधील 99 लाख 13 हजार 60 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 4 कोटी 28 लाख 80 हजार 229 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 2 हजार 452  व्यक्तींना अधिक तपासणीसाठी  संदर्भीत करण्यात आले आहे.
0000


Popular posts
१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..* *शुभेच्छुक:-........ संपादक संतोष सागवेकर ,सा.पुणे प्रवाह परिवार.....
Image
राम उत्तम गालफाडे मा. पोलीस अधिकारी यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्करांचे मानकरी
Image
स्व. श्रीमती पुष्पा अशोक भुजबळ यांचे अल्पशा आजाराने निधन
Image
मनिषा हिला श्रद्धांजलि वाहण्यासाठी राजीव गांधी विचार प्रसारक मंडळ ट्रस्ट,अखिल भारतीय मानव कल्याण समिति, अरविंद शिंदे मित्र परिवारऻच्या वतीने राजीव गांधी वाचनालय,ससुन वसाहत ते डाॅ.बाबासाहेब उद्यान,पुणे स्टेशन पर्यंत कॅन्डल मार्च चे आयोजन
Image
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image