वांगणीत वाहनांची कडक बंदोबस्तात तपासणी ; कोरोना चा शिरकाव रोखण्यासाठी पोलीस आणि ग्रामपंचायतचे प्रयत्न

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


वांगणीत वाहनांची कडक बंदोबस्तात तपासणी ;

कोरोना चा शिरकाव रोखण्यासाठी पोलीस आणि ग्रामपंचायतचे प्रयत्न

कर्जत,ता.9 गणेश पवार

             ठाणे जिल्ह्यात हैदोस घालत असलेला कोरोना वांगणी गावाच्या आवारात प्रवेश करू नये यासाठी पोलीस यंत्रणा काम करीत आहे.वांगणी ग्रामपंचायत देखील कल्याण-कर्जत रस्त्यावर चोख बंदोबस्त करीत असललेल्या पोलिसांनी मदत करीत असून वांगणी वरून कोरोना कर्जत तालुक्यात शिरकाव करू नये यासाठी घेतलेली खबरदारी 45 दिवसांच्या आतापर्यंतच्या लॉक डाऊन मध्ये मदतगार ठरली आहे.

              कल्याण- बदलापूर- कर्जत या राज्यमार्गादरम्यान येणाऱ्या वांगणी वरून मोठ्या प्रमाणात मालाची ने आण सुरू आहे.या वाहनांची सध्या  वांगणी पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी संदिप निगडे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील मुख्य रस्त्यावर चौकात पोलीस कडक बंदोबस्तात तपासणी करीत आहेत. लॉकडाऊनच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कायद्याचे काटेकोरपणे पालन सुरू आहे. हवालदार चंद्रकांत फडतरे, पोलीस नाईक सी. ए. पाटील, ए. आर. मदगे आदी पोलीस तसेच जिल्हा परिषद शाळांचे शिक्षक आणि ग्रामपंचयात कर्मचारी, स्थानिक तरुण तसेच पोलीस मित्र देखील सहकार्याची भूमिका बजावंताना दिसत आहे.

                दिवसेंदिवस कोरोना व्हायरसचा वाढता आकडा पाहता देशात तिसऱ्यांदा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र या लॉकडाऊनच्या काळात सर्वात जास्त कामाचा ताण आरोग्य विभाग व कायद्याचे रक्षण करणाऱ्यां पोलिसांच्या वाट्याला आला आहे. जस जसे लॉकडाऊन दरम्यान सरकार नियम आणि अटी लागू करत आहे.तसे पोलिसांना आपल्या कार्यपद्धतीत बदल करावा लागत आहे.ना वेळच्या वेळी खानपान, ना घरी परतण्याची वेळ अशा गंभीर परिस्थितीत पोलीस यंत्रणा सज्ज राहून नागरिकांच्या सुरक्षतेसाठी काम करीत आहे.सध्या ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या वांगणी पोलीसांवर देखील कामाचा अतिरिक्त ताण पडला आहे.रोजच्या क्राईम घटनेचा आढावा घेण्यासह विभागातील नगरिकांनी मास्क लावण्यापासून चौकशी करीत आहेत. आढाव्या बरोबरच भर उन्हात उभे राहून मुख्य रस्त्यावरुन धावणाऱ्या संवशयीत वाहनांची तपासणी व कारवाई अशी शेकडो कामे वांगणीतील पोलिसांना करावी लागत आहेत.या सर्व माध्यमातून ठाणे जिल्ह्यात हैदोस घालत असलेला कोरोना 

वांगणी गावात येऊ नये याची काळजी ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासन घेत आहे. त्यात सकाळचे दोन तास व्यापार बाजारपेठ सुरू ठेवून त्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात सर्व यंत्रणा काम करीत आहे.

Popular posts
*एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे, भारततर्फे एमआयटी स्कूल ऑफ कॉन्शियसनेस -अल्टिमेट रिअ‍ॅलिटी संशोधन संस्थेचा शुभारंभ सामाजिक बांधिलकीतून होईल संशोधन*
Image
🚩 *शिवराज्याभिषेक* 🚩 *मनामनात* 🚩 *शिवराज्याभिषेक*🚩 *घराघरात*
Image
कॅशलेस प्रवासाबरोबर आता फास्टॅगवर 5 टक्के कॅशबॅक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून वाहनधारकांसाठी 11 जानेवारी, 2021 पासून सवलत योजना
शिक्षण राज्य मंत्री श्री बच्चुभाऊ कडु यांचा MIT शाळेला दणका, CBSE NOC रद्द करण्याचे आदेश....
Image
कोरोना विषाणू प्रादुर्भाव नियंत्रणाकरिता क्षेत्रीय कार्यालय स्तरावर आढावा,
Image