डोंगरपाडा आश्रमशाळेत तबलिगी जमातीचे लोक आल्याची अफवा... परिसरातील ग्रामस्थ रात्रभर जंगलात...... ग्रामस्थ,पोलीस,वन विभाग यांच्याकडून जंगल पालथे

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


डोंगरपाडा आश्रमशाळेत तबलिगी जमातीचे लोक आल्याची अफवा...

परिसरातील ग्रामस्थ रात्रभर जंगलात......

ग्रामस्थ,पोलीस,वन विभाग यांच्याकडून जंगल पालथे 

कर्जत,ता.9 गणेश पवार

                          कर्जत तालुक्यातील डोंगरपाडा येथे असलेल्या शासकीय आदिवासी आश्रमशाळेत 8 एप्रिल च्या रात्री तीन लोक जेवण मागत होते. आश्रमशाळा बंद असल्याने जेवण मिळणार नाही असे सांगितल्यावर देखील ते अनोळखी तेथे भांडण करीत होते.त्याची माहिती स्थानिकांना मिळताच त्या अनोळखी लोकांना शोधण्यासाठी निघाले असता ते तिघे धोत्रे गावाच्या बाजूला असलेल्या जंगलात पळून गेले आहे.दरम्यान,परिसरातील 12 गावातील लोक रात्री पोलीस आणि वन कर्मचारी तसेच स्थानिक हे फिरत आहेत,मात्र त्या तीन अनोळखी यांचा शोध लागला नाही.

                          बुधवारी 9 एप्रिल रोजी रात्रीं डोंगरपाडा आश्रम शाळेवर काही तबलगी जमातीचे लोक जेवण मागायला आले होते. या आशयाचा मेसेज स्थानिक सोशल मीडिया ग्रुपवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने त्या परिसरात चिंतेचे वातावरण होते. या पोस्ट ची दखल घेऊन नेरळ पोलीस ठाण्याच्या कळंब आउट पोस्टचे सहायक पोलिस उपनिरीक्षक केतन सांगळे,व त्यांचे सहकारी कॉन्स्टेबल गर्जे,तसेच कर्जत पोलीस ठाण्याच्या कशेळे आऊट पोस्ट पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल प्रवीण लोखंडे, सुग्रीव गव्हाणे यांचे अनेक गावातील नागरिक हे घराबाहेर पडले होते.या गावातील ग्रामस्थ आहेत.डोंगरपाडा आश्रमशाळेत काही संशयित आल्याची माहिती मिळताच धोत्रे,शिलार,ताडवाडी, शिलारवाडी,खरबाचीवाडी, मोरेवाडी,डोंगरपाडा,आदी गावातील लोक रात्रभर जंगल पालथे घालत आहेत.

                           कशेळे येथील उदय पाटील,अरुण हरपुडे,रुपेश हरपुडे,अनिकेत मते,माऊली, पाथरज येथील अशोक शिंगटे, मोहन शिंगटे यांनी डोंगरपाडा आश्रम शाळेवरील सुरक्षा रक्षकांची भेट घेऊन वास्तुस्तिथी विचारली. त्यांचे सांगण्यावरून भीमाशंकर हिल, मोरेवाडी, ताडवाडी, पाथरज, नागेवाडी, खोंडेवाडी या सह अनेक गावांना भेट दिली.प्रत्येक गावाच्या सीमेवर व जंगलात अनेक तरुण गस्त घालीत होते. नेरळ पोलीस स्टेशन चे वरिष्ठ अधिकारी दोन जीप आणि कर्मचारी घेऊन तसेच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी सुद्धा यांनी रात्री उशिरा पर्यंत अनेक गावे व आदिवासी वस्ती वाद्यांवर गस्त घालून चौकशी करीत होते. गावात व परिसरात गस्त घालणाऱ्या व्यक्तींना कोणी संशयास्पद आढळले तरी त्यांना मारहाण न करता पोलीसांच्या स्वाधीन करण्याची सूचना देण्यात आली.पोलीस,फॉरेस्ट कर्मचारी व अनेक ग्रामस्थानी परिसर पिंजून काढला असता,अशा प्रकारचे संशयीत इतर कोणीही आढळून आले नाही.