सध्या फार्मा व कॅपिटल गूड्स गुंतवणुकीसाठी योग्य क्षेत्र: एंजल ब्रोकिंग

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


सध्या फार्मा व कॅपिटल गूड्स गुंतवणुकीसाठी योग्य क्षेत्र: एंजल ब्रोकिंग


मुंबई, १४ एप्रिल २०२०: सध्या फार्मा आणि कॅपिटल गुड्सचे क्षेत्र हे गुंतवणूकदारांसाठी उत्तम समजले जात आहे. फार्मास्युटिकल आणि हेल्थकेअर कंपन्यांनी सकारात्मक चिन्हे दर्शवली असून भविष्यातही अशाच स्थितीची अपेक्षा आहे. आपल्या देशात लॉकडाउन आताच संपणार नाही, त्यामुळे कॅपिटल गुड्स हादेखील उत्तम पर्याय असून निर्बंध उठवल्यानंतर उत्पादक उत्पादनात वाढ करतील अशी आशा एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी व्यक्त केली. अर्थात लॉकडाउन कशाप्रकारे शिथिल केले जाईल यावर हे सर्व अवलंबून आहे.


जागतिक स्तरावर तेल निर्यात करणा-या देशांमधील दीर्घकाळ चाललेला संघर्ष आता अधिकृतपणे संपला आहे. ओपेक+, तसेच ओपेक देश आणि रशिया यांच्या समूहाने मे आणि जून महिन्यात दैनंदिन उत्पादनात ७.७ दशलक्ष बॅरल कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर २०२२ पर्यंत हळू हळू उत्पादन वाढवले जाईल. या निर्णयामुळे बाजारात विस्तृत प्रमाणावर स्थैर्य लाभेल. तथापि मार्केट आधीच ज्यादा पुरवठ्यामुळे संघर्ष करत असताना पुढील काही महिने ते टिकवणे गरजेचे असल्याचे श्री अमर देव सिंह यांनी सांगितले.


जागतिक संकेतः


इतर आशियाई समकक्षांकडून संकेत घेत भारतीय इक्विटी बाजाराला सोमवारी जरा नाजूक स्थितीतच सुरुवात झाली. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव थोडा सपाट होण्याच्या दिशेने असतानाही आज आशियाई बोर्सेसने कमकुवतपणाची चिन्हे दर्शवली. गेल्या आठवड्यात, जपानने २४३.५ येन पॅकेज देऊन उद्योगांना चीनमधून बाहेर येण्यास प्रोत्साहन दिले. चीन आणि अमेरिका यांच्यातही तणाव वाढत असल्यामुळे जागतिक बाजारपेठेत अस्वस्थता दिसून येत आहे. या घडामोडींमुळे गुंतवणूकदारांना थोडी भीती वाटत असून नजीकच्या काळात हाच ट्रेंडिंग पॅटर्न पहायला मिळू शकतो.