निसर्ग/ पृथ्वी स्वतःला  दुरूस्त करत आहे. होय प्रकृति स्वतःला  रिबूट करत आहे. 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


निसर्ग/ पृथ्वी स्वतःला  दुरूस्त करत आहे.
होय प्रकृति स्वतःला  रिबूट करत आहे.


ओड़िशाच्या समुद्र किनाऱ्यावर लॉकडाउन असल्यामुळे कोणतेच पर्यटक नाहीत.
त्यामुळे 1, 2 नव्हे चक्क 8 लाखाच्या वर कासवे तिथे अंडी घालायला आली आहेत.
आणि एक कासव जवळपास 100 च्या वर अंडी देत असते.
त्यामुळे  लुप्त होत चाललेली प्रजाति olive riddle turtle चे जवळपास 1 कोटी च्या वर पिल्ले जन्माला येणार 
आणि ती प्रजाति लुप्त होण्यापासून वाचणार आहे. 
गंगा नदीचे पाणी शुद्ध होतय,
हो कारखाने लॉकडाउन मुळे बंद आहेत 
आणि त्या कारखान्याचे दूषित पाणी गंगेत मिसळत नसल्यामुळे ती शुद्ध होते आहे. 
हिमाचल प्रदेशात असणारे डोंगर हे तिथुन जवळपास 290 ते 300 km दूर हरियाणातून सहज़ दिसायला लागलेत,
जे प्रदुषणामुळे दिसत नव्हते.
ओझोनचे कवच त्याला जिथे छिद्र पडत आहे असा ऐकायला नेहमी येत असे ते ओझोन कवचच आता स्वतःला  सुधारत आहे. 
मानवी वर्दळीमुळे पृथ्वी ची कम्पने जी वाढली होती ती आता 20 ते 30 टक्क्यांनी कमी झाली आहेत. 
मुंबई, दिल्लीचे प्रदुषण घटत आहे. समुद्र किनारी जंगली श्वापदे हिंडताना पहायला मिळत आहेत जे फारच क़्वचित झालं असेल. 
एकंदरीतच बघायला गेलो तर निसर्ग स्वतःला दुरूस्त करत आहे असेच म्हणावे लागेल, 
तसे आपल्या पुर्वजांनी आम्हाला सांगितले होते की मानवाला काहीच करायची गरज नाही .
निसर्गामध्ये ढवळाढवळ करू नये,
 त्यामधे एवढी ताकद आहे की तो स्वतःची काळजी स्वत: घेऊ शकतो आणि बघा आज त्यांचे शब्द खरे ठरले. 


ह्या कोरोनाची भीति तर आहेच पण त्याची तुलना कराल तर रोज रस्त्यावरील अपघात आणि इतर अनेक कारणामुळे होणारे मृत्यु त्याचा जो आकड़ा आज थांबलेला आहे तो या कोरोना च्या आकड्यांपेक्षा कित्येक पटीने जास्त असता. 


म्हणून सरकार सांगत आहे की घरी रहा, 
त्यांचे तर ऐकाच पण या निसर्गाचे सुद्धा ऐका 
आणि घरी रहा, 
आपण सीरियस झालो की hospital ला एडमिट करुन आपल्याला विश्रांती घ्यायला सांगतात ना, 
तशीच आता निसर्गाला विश्रांतीची गरज आहे, 
त्याला विश्रांती घेऊ द्या. 
*पुढे शुद्ध वातावरण आपली वाट पाहात आहे त्याचा आस्वाद घ्यायचाय ना? *
मग आता तरी घरी थांबा, 
हीच निसर्गाची हाक आहे मानव जातीला 
ती आता तरी ऐकु या ........


🙏