पत्रकारांना विमा योजने अतंर्गत सुरक्षा कवच मिळाले पाहिजे.... खासदार सुप्रिया सुळे.*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल**पत्रकारांना विमा योजने अतंर्गत सुरक्षा कवच मिळाले पाहिजे.... खासदार सुप्रिया सुळे.*


*मुंबई : -* महाराष्ट्र राज्य सरकारने डॉक्टर ,आरोग्य कर्मचारी आणि पोलीस यांना सुरक्षा विमा कवच दिले आहे.खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या  ट्वीट खात्यावरुन  मागणी केली आहे की,देशातील सर्व राज्यांनी पत्रकार , फोटोग्राफर,आणि कैमेरामेन सर्व  पत्रकार आणि सहकर्मचारी हे सरकार, प्रशासन आणि जनतेत  दिवस- रात्र कठोर परिश्रम करीत असतात.कोरोना व्हायरसने सर्वत्र भयावह परिस्थिती असताना ,कोरोना संदर्भातील सर्व माहिती बातमी रुपाने सरकारची सर्व अपडेट जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून,पत्रकार,फोटोग्राफर आणि कैमेरामेन कार्यरत असतात.त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व पत्रकार बांधवांना वीमा  सुरक्षा कवच अतंर्गत लाभ देण्याची मागणी, ट्वीटर मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.उध्दवजी ठाकरे यांच्या कडे खासदार सुप्रिया सुळे यांनी  केली आहे.