पुण्यामध्ये सर्वप्रथम सिंहगड रोड परिसरामध्ये कोरोना लागण झालेले काही पेशंट पुणे महानगरपालिका मिळाले.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


पुण्यामध्ये सर्वप्रथम सिंहगड रोड परिसरामध्ये कोरोना लागण झालेले काही पेशंट पुणे महानगरपालिका मिळाले. त्यावर त्वरित कारवाई करत महानगरपालिकेने संपूर्ण शहरांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार अतिशय प्रभावीपणे lockdown जे नियम योग्य रीतीने पाळले. या परिसरातील अनेक नगरसेवकांनी विशेषता दादा उर्फ प्रसन्न दादा जगताप या पुण्याचे माजी उपमहापौर असलेले आणि विद्यमान नगरसेवक यांनी या संकटावर मात करण्यासाठी अतिशय दूरदृष्टीने आणि प्रभावीपणे काही पावले उचलली.  त्यामध्ये विशेषतः सोसायट्यांमध्ये जाऊन औषध फवारणी,  सिंहगड परिसरामध्ये ज्या लोकांच विलगीकरण करण्यात आलेला आहे त्या लोकांवर पोलीस यंत्रणेमार्फत  लक्ष ठेवलं. त्याचबरोबर विलगीकरणातील लोकांना जीवनावश्यक वस्तूंची कुठल्याही प्रकारची कमतरता जाणवणार नाही याचीही काळजी त्यांनी घेतली.  विशेषता संचारबंदी च्या काळामध्ये त्यांनी या भागांमध्ये कार्यरत असल्याले सर्व पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, महानगरपालिकेचे स्वच्छता विभागात काम करणारे सर्व कर्मचारी,आरोग्य विभागात काम करणारे सर्व कर्मचारी, अत्यावश्यक सेवेस मध्ये येणाऱ्या सर्व घटकांना त्यांनी सगळ्या सुविधा पुरवण्याचा मोठा उपक्रम राबवला.याशिवाय सिंहगड रोड परिसरामध्ये जे रस्त्यावरील भिकारी,बेघर लोक, कामगार वर्ग, या परिसरातील वेगवेगळे अनाथाश्रम आणि बाहेरगावाहून आलेली ज्यांना जेवणाची सोय नाही अशा परिसरातील सर्व लोकांसाठी त्यांनी अन्नदानाच काम सुरू ठेवलेला आहे. या लोकांना वेळ प्रसंगी त्यांच्या घरी जाऊन जेवण देण्याचा उपक्रम त्यांनी राबवला आहे.  त्यामुळे आज या परिसरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे कोरोना वर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आलेला आहे.  सर्वप्रथम कोरोना लागण झालेल्या या भागांमध्ये आज सुदैवाने एकही  बाधित रुग्ण नाहीये. याशिवाय ज्या लोकांना कोरोना झाला होता ते लोकसुद्धा सुखरूपपणे कोरूना मुक्त होऊन आपापल्या घरी आलेले आहे.या सर्व उपक्रमांमध्ये प्रसन्न जगताप यांची दूरदृष्टी, समाजाप्रती असणारी त्यांची एक निष्ठा आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे दिसते.  या त्यांच्या कार्यासाठी सिंहगड रोड परिसरातील सर्व लोकांतर्फे माननीय प्रसन्न दादा जगताप यांचं कौतुक होत आहे.  पुढील त्यांच्या वाटचालीला शुभेच्छा !   गौतम कोतवाल. लेखक, ग्रीन वर्ल्ड क्लब अध्यक्ष