स्टार प्रवाहवर मनोरंजनाची अनोखी मेजवानी, पहा कधीही हार न मानणाऱ्या बबनची कहाणी २६ एप्रिल २०२० ला ;स्टार प्रवाह वर्ल्ड प्रीमियर जरूर पहा दुपारी ३.०० वाजता

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


:-* स्टार प्रवाहवर मनोरंजनाची अनोखी मेजवानी, पहा कधीही हार न मानणाऱ्या बबनची कहाणी


बॉक्स ऑफिसवर छप्परतोड कमाई करणाऱ्या ‘बबन’ सिनेमाचा स्टार प्रवाहवर वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर


पुणे:       राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सिनेमा ख्वाडाचे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी बबन सिनेमा दिग्दर्शित केला आहे. ग्रामीण जीवनावर आधारित असलेल्या या सिनेमात भाऊसाहेब शिंदे आणि गायत्री जाधव यांची प्रमुख भूमिका असून, हा सिनेमा मनोरंजनाबरोबरच सामाजिकतेचे अंजनदेखील डोळ्यात घालतो.                          


बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळवलेल्या ‘बबन’ सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर आज म्हणजेच २६ एप्रिलला दुपारी ३ आणि संध्याकाळी ७ वाजता स्टार प्रवाहवर पाहायला मिळणार आहे. लॉकडाऊनच्या काळात या सुपरहिट सिनेमाची मेजवानी स्टार प्रवाह वाहिनी घेऊन आली आहे.