पुणे प्रवाह न्युज पोर्टल
युनिवन फाउंडेशनचे पीएम केअर्स निधीत योगदान
मुंबई, ९ एप्रिल २०२०: ‘योग्य उद्देशासाठी एकत्र येणे’ या हेतूने स्थापन झालेल्या युनिवन फाउंडेशनने आज २.५० लाख रुपये पीएम केअर निधीसाठी दान केले. युनियन बँक ऑफ इंडियातील एक्झिक्युटिव्ह्जच्या पत्नींनी स्थापन केलेल्या या फाउंडेशनने भारतातील कोरोना या साथीच्या आजाराविरोधात हे योगदान दिले आहे. युनिवन फाउंडेशन ही नेहमीच सामाजिक कार्यात आघाडीवर असते. विशेषत: गरीब आणि गरजूंच्या विकासासाठी ती पुढाकार घेते. देशावर ओढवलेल्या या गंभीर परिस्थितीत मदत करण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न असल्याचे युनिवन फाउंडेशनच्या अध्यक्षा सत्यवती राय यांनी सांगितले