संशयित रुग्ण व्यक्तींच्या  क्वारंटाईनसाठी आझम कॅम्पसची जागा देण्याची व्यवस्थापनाची तयारी*        

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


प्रेस नोट
*संशयित रुग्ण व्यक्तींच्या  क्वारंटाईनसाठी आझम कॅम्पसची जागा देण्याची व्यवस्थापनाची तयारी*                                                                                                                                            ----------------------------------------                                                                      डॉ. पी. ए. इनामदार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
पुणे :
पुण्यातील मध्यवर्ती पेठांमधील कोरोना संसर्गाची वाढती व्याप्ती लक्षात घेता कॅम्प,भवानी पेठ,नाना पेठ ला लागून असणाऱ्या आझम कॅम्पस च्या इमारतींमधील जागा संशयित रुग्णांच्या  क्वारंटाईन साठी प्रशासनाला देण्याची तयारी व्यवस्थापनाने दर्शवली असून  तसे पत्र कॅम्पस चे अध्यक्ष डॉ. पी.ए. इनामदार यांनी आज १५ एप्रिल  रोजी  जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना दिले आहे. आझम कॅम्पस मधील  प्रार्थना स्थळाची सर्व सुविधांसह दुमजली जागाही देण्याची तयारी येथील व्यवस्थापनाने ठेवली आहे. येथे आलेल्या रुग्णांची नाश्ता,जेवणाची व्यवस्था करण्याची ,पोलीस बंदोबस्त आणि शासकीय कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्याची तयारी असल्याचे या पत्रात म्हटले आहे. आझम कॅम्पस मधील शैक्षणिक सुविधा पूर्ववत सुरु होईपर्यंत ही जागा शासनाला उपलब्ध करून देण्याची तयारी असल्याचे या पत्रात म्हटले आहे. 
--------------------------------------------