कोरोनाच्या काळात सर्व राजकीय पक्षाचे पत्रकारांकडे दुर्लक्ष

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


प्रसिद्धसाठी पत्रकार पाहिजे....पण पत्रकारांना मदत करणार नाही 
पालकमंत्री, खासदार, आमदार आणि रा. जि. प. सदस्यांचे स्थानिक पत्रकारांकडे दुर्लक्ष तर पक्षाचे पदाधिकारी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी पत्रकारांकडून अपेक्षा
             किती भयानक पत्रकारांची परिस्थती आहे. छोटछोट्या कार्यक्रमासाठी पत्रकार पाहिजे. आपली प्रसिद्धी झाली पाहिजे आणि आपण किती समाजकार्य करतो हे दाखविण्यासाठी आयत्यावेळी पत्रकारांना बोलाविले जाते. बरं हि बातमी एका पेपरमध्ये प्रसिद्ध होऊन हि पोट भरत नाही म्हणून वैयक्तिक पत्रकारांना थोडक्यात मजकूर आणि फोटो पाठवित आहे. मग इलेकट्रोनिक मीडिया, प्रिंट मीडिया, यु ट्यूब मीडियाला पाठवून आम्हाला जास्तीत जास्त प्रसिद्धी द्या अशी कैवीलवाणी विनंती केली जात आहे.  परंतु जे पत्रकार तुमच्यासाठी करतात त्यांच्यासाठी तुम्ही काय करतात ? आहे का याचे उत्तर ..... नसणार ... कोणत्याच नेत्याकडे याचे उत्तर नसणार. 
          पालकमंत्री....खासदार....आमदार ....रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य , नगरपरिषद आणि पक्षाचे आजी-माजी लोकप्रतिनिधी , पदाधिकारीं यांना फक्त प्रसिद्धीसाठी पत्रकार पाहिजे. बातमीमध्ये नाव टाकले नाही कि लगेच पत्रकाराना फोन करणार, एखाद्याची सत्य बातमी केली तर लगेच धमकी देणार, बदनाम करणार. फोन करून उलटसुलट बोलणार. या लोकांना फक्त चांगले बातम्या देण्यासाठी पत्रकार पाहिजे पण आपण काय घोटाळा केला, काय भ्रष्टाचार केला यावर कोणी लिखाण करायचे नाही कोणी आवाज उठवायचे नाही हे असते पांढऱ्या कपड्यामागे खरे सभ्यता. पण कोणताच नेता पत्रकारांसाठी आवाज उठवीत नाही. पत्रकारांना टोल फ्री नाही. योजना नाही, मेडिकल फ्री नाही किंवा सवलत नाही. पत्रकारांसाठी सवलत नाही. पगार नाही. मानधन आताचे 500 ते 1500 आहे एवढ्या महागाईत या किरकोळ रक्कमात स्वतःचाही खर्च निघत नाही. हि आहे व्यथा कथा. पण या लॉक डाऊन मध्ये कित्येक पत्रकारांना कोरोनाला सामोरे जावे लागले आहे. पोलीस प्रश्नाला पन्नास लाख तर महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना दहा लाख, मग पत्रकारांनी काय गुन्हा केला आहे कि त्यांना काहीच सेवा उपलब्ध नाही. 
          धान्य वाटप करतांना फोटो काढता. नक्की यांना दाखवायचे आहे तरी काय ! त्यांच्याजिवावर कुटुंब चालत आहे का ? अरे जे तुम्ही पैसे कमविले आहे ते सरळ मार्गाने नाही कमविले. याच कार्यकर्त्यांना हाताशी धरून दमदाटी करून ब्लॅकमेल करून कमवितात. निवडणुकीकाळात घरोघरी जाऊन मत द्या  अशी विनंती करतात पण रातोरात पैसे वाटप करून मत विकत घेतात हे का नाही जाहीर करत हे कुठून पॆसा येतो ते प्रामाणिक कमाईतून तर नाही. सध्या यावर सोशल मीडियावर खूप टीका होत असून यावर आता कोणचं खुलासा देत नाही कोणचं आवाज उठवीत नाही. मला एकच सांगायचे आहे जे पत्रकार आपले कर्तव्य पार पडतात तर त्यांना त्यांच्या पद्धतीने कमी करू द्या विनाकारण आमच्याकडे पद आहे तर आम्ही पदाचा गैरवापर करून पत्रकारानवर दमदाटी केली जाते. हि कोणती पद्धत आहे. पत्रकारांचा कोणी संयम बघू नका.बोलाला खूप सोपं आहे पण प्रत्येक्षात मैदानात उतरून काम करून बघा. 
      मला की सांगा तुमच्यामध्ये दम आहे तर का पत्रकारांना बोलावितात ,, का त्यांच्या तुमचे व्यथकथा सांगतात, तुम्हाला न्याय मिळाला नाही तर तुम्ही पत्रकारणकडे कशाला जातात. कशाला पत्रकार परिषद घेतात.जनतेचे प्रश्न नव्वद टक्के काम हे पत्रकार करत आहे. याचे भान सर्वानी ठेवा. या लॉकडाऊनमुळे कित्येक पत्रकारांची नोकरी गेलेली आहे. नोकरी करणार्यांना कामावरून काढून टाकले तर लगेच उपोषण आंदोलन , मोर्चा काढतात. मग पत्रकारांनी काय केले पाहिजे. तुम्हाला कधी पत्रकार स्वतःच्या हक्कासाठी भांडताना दिसले का ? सांगा.....
                 साहेब मी एक साधा पत्रकार आहे 🙏🙏 गणेश पवार