पुणे प्रवाह न्युज पोर्टल
प्रेस नोट
*'आम्ही वारजेकर मित्र परिवारा' चे वतीने*
*वारजे माळवाडी च्या ३५० कुटुंबाना घरपोच शिधा*
पुणे :
सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतुन 'आम्ही वारजेकर मित्र परिवारा' चे वतीने शुक्रवारी वारजे माळवाडी परिसरातील ३५० कुटुंबाना कोरडा शिधा कीट चे घरपोच वाटप करण्यात आले.पुणे मनपाचे स्वीकृत सभासद सचिन दशरथ दांगट, उद्याेजक भाऊसाहेब जंजिरे, दिपकमामा भोसले, युवा कलाकार आदित्य बीडकर, कवि राजेंद्र वाघ, ऋषिकेश रजावत, कृष्णा गिरमे, आनंद देशपांडे, अमजद अन्सारी, चेतन मेस्त्री, वर्षा पवार, रेणुका मोरे यांनी परिश्रम घेतले .
वारजे माळवाडीतील रामनगर , गोकुळनगर , अमरभारत सोसायटी , यशोदिप चौक परिसर,म्हाडा काॅलनी, सहयोगनगर, गोकुळनगर पठार, भोपळे चौक, राजयोग सोसायटी , वारजे हायवे चौक, दत्तनगर, विठ्ठलनगर, रेणुकानगर, गणेशपुरी, दिगंबरवाडी, अहिरे गाव येथील कष्टकरी, मोलमजुरी करणारे, मध्यमवर्गीय गरजु कुटुंबांना आजपर्यंत किमान ३५० कुटुंबाना या शिधा किटचे १ महिना पुरेल , १५,दिवस पुरेल , काहींना ३ किलो गहू , २ किलो तांदुळ अश्या प्रमाणात वाटप करण्यात आले आहे . श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्टच्या माध्यमातुन १२५० जेवणाचे पॅकेट वाटण्यात आले .
यात कामगार, घरकाम, टेलरिंगकाम, मोलमजुरी, सुतारकाम, पेटींगकाम, गवंडी, ड्रायव्हर,कपडे विकणे, पेट्रोल पंप कर्मचारी, वाॅचमन अशी कामे करणारे कुटुंबांचा समावेश होता.
यामध्ये ५ किलो गहू , ५ किलो तांदुळ, १ किलो तूरडाळ, २ किलो तेल, २ किलो साखर, अर्धा किलो चहापावडर , १ किलो मीठ, हळद, मिरची पावडर, जिरे, मोहरी प्रत्येकी १०० ग्रॅम, खोबरेल तेल , अंगाचा साबण १ , कपड्याचा साबण २, टुथपेस्ट १०० ग्रॅम इत्यादी वस्तुंचा सामावेश होता . वारजे माळवाडी परिसरातील खरच ज्यांचे हातावर पोट आहे ,ज्यांना गरज आहे अश्या गरजूंची खात्री करून या कीटचे वाटप करण्यात आले . स्वयंसेवी संस्थेच्या वतीने दररोज किमान १०० फुड पॅकेटचे गरजुंना वाटप करण्यात येत आहे . ----------------------------------------