चिंचोलीत केळीच्या शेतात सापडली पारगावहून चोरलेली बैलजोडी

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


चिंचोलीत केळीच्या शेतात सापडली पारगावहून चोरलेली बैलजोडी
__________________________________


बिडगाव, जि.जळगाव येथून जवळच असलेल्या पारगाव येथून दोन शेतकऱ्यांचे चोरीस गेलेले एक-एक बैल बुधवारी चिंचोली, ता.यावल येथील डॉ.भालेराव साठे यांच्या केळीच्या शेतात सापडल्याने शेतकरींचे आर्थिक नुकसान होण्यापासून वाचले.
मंगळवारी रात्री धानोरा येथे रमेश महाजन यांना रवी टेलर यांच्या घराजवळ काही चोर लपलेले दिसल्याने त्यांनी पोलीस पाटलासह लोकांना बोलावून परिसर पिंजून काढला होता. मात्र चोर पळून गेले होते. पारगाव येथून येथील शेतकरी विलास अर्जुन पाटील व बी.आर. पाटील यांचा प्रत्येकी एक एक बैल रात्री चोरीस गेला आहेत.त् यामुळे धानोरा व पारगाव येथील तरूनांनी पुन्हा बैलजोडीची शोधमोहीम सुरू केली असता चिंचोली येथील शेतकरी डॉ.भालेराव बाऊराव साठे यांच्या शेतात केळीचे खोड काढणारे मजूर विक्रम कोळी व निंबा पाटील यांनी दाट केळीच्या शेतात बैलजोडी बांधलेली बघून तेथील पोलीस पाटील राकेश साठे यांना कळविले. त्यांनी धानोरा येथील किरण महाजन यांना फोन करून बैल जोडीमालक विलास पाटील व बी.आर पाटील यांच्या ताब्यात बैलजोडी दिली. त्या आधी दोघांनी बैल जोडी चोरीची फिर्याद अडावद पोलीस स्टेशनला नोंदविली होती. धानोरा पोलीस पाटील दिनेश पाटील, पारगावचे शरद पाटील, चिंचोलीचे राकेश साठे यांनी समन्वय साधत तुरूंनाच्या मदतीने शेतकऱ्यांना बैल जोडी परत मिळवून दिली.