मानवजातीला दैवी कणच वाचवू शकेल प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांची भावना 

      पुुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


कृपया प्रसिद्धीसाठी       दिनांक: 2/4/2020


मानवजातीला दैवी कणच वाचवू शकेल
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांची भावना 


पुणे, दिनांक: 2 एप्रिल:आज संपूर्ण जगात कोरोनाव्हायरसच्या विषानुसारख्या अति सूक्ष्म कणाने संपूर्ण मानवजातीला भयभीत करून टाकले आहे.अशा वेळेस महान तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊली व जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या संदेशानुसार ईश्वरी कण किंवा देव कण (जिवाणू कण) जगातील संपूर्ण मानव जातीला निश्चितच वाचवू शकेल असा विश्वास वाटतो. कोरोनाव्हायरसमुळे प्रथमच संपूर्ण जगाला देव कळला. एका भयाण शांततेची या जगाने  अनुभूती घेतली आहे. संपूर्ण मानवी इतिहासात प्रथमचं जगातील सर्व मंदिरे,  मस्जिद, चर्च, गुरुद्वारा व बुद्ध विहार एकाच वेळी बंद झालं हे पहिल्यांदाच अनुभवले आहे. भारतीय संस्कृतीच्या संदेशाप्रमाणे विश्व धर्मी मानवतावादी निसर्ग धर्माचे आपण पालन केल्यास या कोरोनाव्हायरसची भीती बाळगण्याचे कारण नाही. परंतु प्रत्येकाने घरात अंतर्बाह्य स्वच्छता ठेऊन सर्वतोपरी आहारावर नियंत्रण ठेवावे. मानवजातीला ध्यान धारणा, प्राणायाम व योग साधनेच्या माध्यामातून प्रसन्न जीवन जगण्याची पूर्णपणे खात्री वाटते. निसर्गाशी अथवा प्रकृतीशी एकरूप झाल्यास पुढील अनेक शतकं मानव सुख समाधानाने नांदू शकेल. अशी भावना एम.आय.टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी श्री रामनवमीच्या निमित्ताने व्यक्त केली.
ते म्हणाले,  कोरोनाव्हायरस  एका अतिसूक्ष्म विषाणूने आज संपूर्ण जगाला गुडघे टेकायला लावले आहे. सुपरपॉवर म्हणून ओळखले जाणारे अमेरिका, चीन, ब्रिटन, फ्रान्स, रशिया असे देश असोत किंवा इटली, जर्मनी, इराण, कॅनडा असोत, ह्या जीवघेण्या संसर्गाने जगभरात हाहा:कार माजवला आहे. परंतु आज संपूर्ण जग याचे विध्वंसक परिणाम भोगत आहे.
मानवाच्या उत्पत्तीपासूनच मानवाने विविध गोष्टींसाठी संघर्ष केला आहे. अशांतता निर्माण केली आहे. अगदी स्वतःचे अस्तित्व टिकवण्यापासून ते स्वतःचे वर्चस्व स्थापित करण्यापर्यंत. तसेच स्वतःची हौस भागवण्यापासून ते स्वतःची प्रगती साधण्यापर्यंत. प्रत्येक गोष्टीसाठी त्याने प्रकृतीला हानि पोचवली आहे.
अमेरिका, रशिया, चीन, जर्मनी इ. देशांकडे मिळून आज पृथ्वीला दहा हजार वेळा बेचिराख करू शकतील इतकी अणुबॉम्ब, हायड्रोजन बॉंब, न्यूट्रॉन बॉंब आदि संहारक अस्त्रे आहेत. हा सगळा शस्त्रसाठा जमवून आपण काय साधलं? आज एका सूक्ष्म जीवाच्या संसर्गामुळे आपण बाविसावे शतक बघू की नाही अशा  परिस्थितीत अणू रेणू थोकडा तुका आकाशा ऐवढा या उक्ती प्रमाणे तुकाराम महाराजांनी असे म्हंटले आहे की ,मी विश्वातला छोट्यातला छोटा कण असलो ,तरी मी संपूर्ण विश्व व्यापू शकतो.अशा प्रकारची उर्जा किंवा चैतन्य माझ्या मध्ये आहे.त्याचप्रमाणे तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊली यांनी ७३० वर्षांपूर्वी संपूर्ण विश्व हे चैतन्य स्वरूप आहे असे लिहून ठेवले आहे.आज या संकटाच्या वेळी संपूर्ण मानवजातीने अंतर्मुख होऊन आध्यात्माचा आधार घेऊन या देव कणाला आणि चैतन्यमय शक्तिला आवाहन करण्याची वेळ आली आहे. काम,क्रोध, लोभ, मोह, मध आणि मत्सर आणि विकार, विकृती आणि विकल्प यांचा त्याग करून या दैवी शक्तीशी  एकरूप होऊन आलेल्या संकटाचा सामना केला पाहिजे.त्यातूनच आपले अस्तित्व टिकवता येईल,असे प्रा. डॉ. विश्वनाथ. दा. कराड यांनी सांगितले.


जनसंपर्क विभाग
माईस एम .आय. टी, पुणे