पुणे प्रवाह न्युज पोर्टल
*आमच्या गावात, रास्त भावात.....*
*************************
शेतकरी व ग्राहक भावांनो,
सध्या कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंध करण्यासाठी संबंध देशात लॉकडाऊन आहे.या काळात शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीसाठी व ग्राहकांना खरेदीसाठी फार अडचणी येत आहेत.तर अडचणींचा गैरफायदा घेऊन दलालां मार्फत दोघांचीही लुट होत आहे. शेतकऱ्यांकडून मातीमोल भावाने शेतीमाल खरेदी करून ग्राहकांना १० ते २० पट अधिक किंमतीने विक्री केली जात आहे.
म्हणुन शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा.अनिल घनवट यांनी 'आमच्या गावात, रास्त भावात' हे अभियान राबविण्याचे घोषीत केले आहे. या अभियानात शेतकऱ्यांनी स्वत: उत्पादीत केलेला शेतीमाल थेट ग्राहकांना विकायचा आहे.यामध्ये शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते शेतकऱ्यांना सहकार्य करणार आहेत.
तरी लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्याकडील शेतीमाल विक्रीसाठी व ग्राहकांनी खरेदीसाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा.
*******************************
रुपेश शंके बालाजी माधव कंदेजाधव
युवा जिल्हाध्यक्ष. कार्याध्यक्ष माजी जिल्हाध्यक्ष
९९२१९५९२२२ ९८२३६३०९६० ९४२१३६९१६०