३ महिन्याचे लाईट बील माफ करावे....महेंद्र कांबळे रिपाई - (आठवले गट)*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


 


३ महिन्याचे लाईट बील माफ करावे....महेंद्र कांबळे रिपाई - (आठवले गट)*



 *पुणे :-*  कोरोना मुळे संपूर्ण देशात आणि आपल्या राज्यात ही लाँक डाऊन असल्याने, बहुतेक झोपडपट्टीत राहणारे रहिवाशांचे हातावरचे पोट असल्याने, त्यांना आर्थिक चणचण भासत आहे.परंतु अन्न प्रशासनाने रेशन कार्डधारकांना वेळेवर रेशन मिळाल्याने, दिलासा दायक वातावरण आहे.तरी या भागात बहुतांश हातावरचे पोट असणारे कष्टकरी वर्ग पैशा अभावी वंचित आहे.हमाल,रिक्षा चालक,धुणे - भांडी करणाऱ्या महिला वर्ग,पेंटिंग ,सुतार काम करणारे आणि रोजंदारीवर मिळेल ते काम करणारा वर्ग जास्त प्रमाणात वास्तव करून राहतात.झोपडपट्टी वासीयांचे
 मार्च,एप्रिल आणि मे २०२० महिन्याचे लाईट बील पुर्णपणे माफ करण्याची मागणी ,रिपब्लिकन पार्टी (आठवले गटाचे ) 
पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष 
मा.महेंद्र कांबळे यांनी पत्राद्वारे ,मुख्यमंत्री मा.उध्द्वजी ठाकरे यांच्याकडे केले आहे.