कुलगाम चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


कुलगाम चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा
___________________________________


कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जम्मू-काश्मीरसह  देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लोकांनी घराबाहेर पडू नये यासाठी वारंवार प्रशासनाकडून आवाहन देखील करण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील मनगोरी परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना मोठं यश आले आहे. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे. 


वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये कुलगाममध्ये चकमक सुरू झाली. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. यावेळी दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला असून त्यांच्या गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.