पुणे प्रवाह न्युज पोर्टल
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त
प्रशासनाच्यावतीने अभिवादन
पुणे, दि.14(जिमाका) :- भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आज जयंतीनिमित्त प्रशासनाच्या वतीने विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी उपायुक्त संजयसिंह चव्हाण, नगरपालिका प्रशासन विभागाचे उपसंचालक प्रशांत खांडकेकर, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनीही डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करुन वंदन केले.
00000