पुणे पांजरपोल ट्रस्ट च्या वतीने वैद्यकीय उपकरणे खरेदी करणेकरिता अर्थ सहाय्य,

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


कृपया प्रसिद्धीकरिता,


पुणे पांजरपोल ट्रस्ट च्या वतीने वैद्यकीय उपकरणे खरेदी करणेकरिता अर्थ सहाय्य,
पुणे पांजरपोल ट्रस्टच्या वतीने पुणे महापालिकेस वैद्यकीय साधन सामुग्री खरेदी करणेकरिता आज रक्कम रुपये २१,लाख रकमेचा धनादेश मा,महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांचेकडे सुपूर्त केला,
मा,महापालिका आयुक्त यांचे कार्यालयात पांजरपोल ट्रस्टच्या पदाधिकारी यांनी आज भेट घेतली,
याप्रसंगी मा,महापौर मुरलीधर मोहोळ व महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी संबंधित पदाधिकारी यांचे आभार व्यक्त करताना सांगितले की,सद्धयस्थिती मधील परिस्थिती नुसार मदतीचे आवाहन केल्यामुळे अनेक संस्था,संघटना मदतीकरिता पुढे येत आहेत,
पुणे मनपाच्या रुग्णालयात सध्या अद्ययावत वैद्यकीय साधन सामुग्री व उपकरणे कोणती आवश्यक आहेत याबाबत यादी करण्यात आली असून या यादीनिहाय वस्तूस्वरूपात मदत मिळाल्यास योग्य होईल,अशी कल्पना नमूद केल्यावर पांजरपोल च्या पदाधिकाऱ्यांना उत्तम पर्याय असल्याचे सांगितले त्यानुसार यादीनुसार मोठया प्रमाणात मदत केली जाईल,तसेच पुणे मनपास यापुढील काळातही कोरोना परिस्थिती संपल्यानंतरही भविष्य काळात संकटे आल्यास अवश्य ती मदत केली जाईल,
असे पांजरपोल ट्रस्ट चे चेअर मन श्री,श्रीधर पित्ती,मॅनेजिंग ट्रस्टी ओमप्रकाश रांका, यांनी सांगितले,
तसेच कोरोना विषाणू प्रादुर्भाव  परिस्थितीमुळे ज्या अनाथ व दुध न देणाऱ्या गाईंचा सांभाळ ज्यांना करणे शक्य नाही अशा सर्व गाई भोसरी येथील पांजरपोल संस्थेत नोंदणीकृत करून सांभाळ विनामूल्य केला जाईल,असेही त्यांनी सांगितले,
याप्रसंगी सभागृह नेते धिरज घाटे,स्था समितीचे अध्यक्ष 
मा,हेमंत रासने, मा,सभासद सुशील मेंगडे,ऊमंग पित्ती,वास्तुपाल रांका,सुहास बोरा,राजेश सांकला,भवरलालजी जैन,सुभाष राणावत,हेमंत 
संभुस, सहाययक आरोग्य प्रमुख डॉ,अंजली साबणे व अन्य अधिकारी उपस्थित होते,
-संजय मोरे,
माहिती व जनसंपर्क अधिकारी 
पुणे महानगरपालिका,
१३/०४/२०२०,


Popular posts
किल्ले सिंहगड मोहीम फत्ते*🚩🚩  ४ फेब्रुवारी १६७० रात्री गडावर तुंबळ लढाई झाली
Image
आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या 226व्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन...
Image
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व आमचे नेते युवराज भाऊ बनसोडे यांच्याशी पोलिस हुज्जत घालून
Image
कोलकातामध्ये डावे-भाजपा विद्यार्थी संघटना भिडल्या; दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीमार
स्टार बॉईज स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य हाफपिच क्रिकेट स्पर्धा बोपोडी येथे पारितोषिक समारंभ आयोजित करण्यात आला यावेळेस प्रमुख पाहुणे  मा श्री कैलासदादा गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
Image