शहरातील नागरिकाना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व करांमध्ये २५% (तीन महिन्याच्या करात) सूट देण्याबाबत....  

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


प्रती,


मा. आयुक्त,


पिंपरी चिंचवड महानगरपालिका.



विषय : शहरातील नागरिकाना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व करांमध्ये २५% (तीन महिन्याच्या करात) सूट देण्याबाबत....



महोदय,



पिंपरी चिंचवड शहरात करोना विषाणू साथीमुळे सर्वत्र लॉक डाऊन सुरू आहे. त्यामुळे अनेक उद्योगधंदे बंद असल्याने लोकाच्या हाताला काम नाही. शहरात जमावबंदी आणि संचारबंदीला जवळ जवळ एक महिना उलटून गेलेला आहे. आजपर्यंत ८१ करोना बाधित रुग्ण आपल्या शहर परिसरात आढळले आहेत. करोना साथीचा प्रादुर्भाव पाहता, पालिका प्रशासनाने ७ दिवसांसाठी अजून कडक लॉकडाऊन लागू केलेला आहे.


एक महिन्यापासून आपल्या महानगरपालिका क्षेत्रातीत सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. लॉकडाऊनमुळे आपल्या महानगरपालिका क्षेत्रात कोणत्याही प्रकारचा व्यापार, उद्योग आणि आर्थिक देवाणघेवाण जवळपास बंद आहे. आपल्या कामगार नगरीत कामगारांच्या हाताला काम नाही. त्यामुळे आपल्या शहर क्षेत्रातीत लोकांचे दरडोई उत्पन्न मागील एक महिन्यात एकदम कमी झाले आहे. 



करोना विषाणूची साथ शहरात दररोज वाढत आहे. यामुळे लॉकडाऊनचा कालावधी अजून वाढण्याची शक्यता आहे. याचा गंभीर परिणाम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अर्थकारणावरती होणार आहे. लॉकडाऊनमुळे महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांची आर्थिक स्थिती संपूर्णपणे खालावली आहे. आर्थिक वर्षाचे कर संकलन मार्च महिन्यात भरला जातो. मात्र लॉक डाऊन कालावधीत महानगरपालिकेचे सर्व प्रकारचे करसंकलन न भरल्याने नागरिकांवर अजून आर्थिक भार वाढविणार आहे. वाढलेल्या आर्थिक भारामुळे व महापालिकेचे सर्व करामुळे शहरातील नागरिकाचे आर्थिक कंबरडे मोडणार आहे. 



पिंपरी चिंचवड क्षेत्रातील नागरिकांना आर्थिक संकटापासून वाचविण्यासाठी, आर्थिक वर्ष २०२०-२१ साठीच्या सर्व करसंकलनात २५% ( तीन महिन्याच्या करात) सरसकट सूट देणे अत्यंत महत्वाचे आहे. सदर सूट महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांवरील आर्थिक भार कमी करून त्यांची आर्थिक क्रयशक्ती वाढविण्यास हातभार लावेल.


आपणास विनंती आहे कि आपण सदर विषयात संपूर्ण लक्ष्य घालून, पिंपरी चिंचवड क्षेत्रातील आर्थिक वर्ष २०२०-२१ साठीच्या सर्व करसंकलनात आपण २५% सरसकट सूट द्यावी. 



आपला विश्वासू,



विशाल शंकर वाकडकर.