साहेब,आमची तेवढी बातमी फोटोसह फ्रंटपेजवर किंवा दर्शनी पानावर ठळक मथळ्यात चांगली लावा बरं का..

*पत्रकारांचं दुर्दैवं...😔* 


*साहेब,आमची तेवढी बातमी फोटोसह फ्रंटपेजवर किंवा दर्शनी पानावर ठळक मथळ्यात चांगली लावा बरं का..पण उद्या आलीच पाहिजे...! यासाठी सर्वच क्षेत्रातील बहुतांश लोक आग्रह धरतात..."पण सध्या  जाहीरात नको.तुम्हाला दिली की,सगळेच मागतात."..पण अडचणीच्या काळात दुर्दैवाने आपल्या हितचिंतकांना एक माणूस म्हणून पत्रकारांची कधीच आठवण होताना दिसत नाही.याचंच तर दुखं वाटते....काहो ? तो पत्रकार माणूस नाही का ? त्याला स्वत:चा परिवार नाही का ? पत्रकार हा फक्त बातमी देण्यापुर्ताच मर्यादित असतो का ? असे अनेक प्रश्न सध्या मला सतावतो आहे..सध्या कोरोनाचा पादुर्भाव वाढल्यामुळे सगळीकडे लाॅकडाऊन आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून प्रत्येकजण जिवाच्या भीतीने घरातच बसला आहे.त्यांचीच काळजी घेण्यासाठी पोलिस, डाॅक्टर,आरोग्य कर्मचारी यांच्याप्रमाणे पत्रकार बांधव सामाजिक बांधिलकी म्हणून स्वत;चा जीव धोक्यात घालून रस्त्यावर फिरतांना दिसत आहेत. सर्व दैनंदिन घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचवून अशा कठीण परिस्थितीत कर्तव्य चोखपणे बजावणारे पत्रकार बांधव अन् त्यांचा परिवार कसा आहे ? त्यांना काही अडचण तर नाही ना...? असा क्षणीक दिलासादायक एकही शब्द अथवा फोन ऐकावयास मिळत नाही. त्यामुळे कधी-कधी हीच खंत मनाला वेदना देऊन जाते.आपण केवळ समाजाचे काहीतरी देणे लागतो,याच हेतूने पत्रकार हा इतरांना न्याय देण्यासाठी विनाकारण मोठ-मोठी माणसे अंगावर घेतो..सतत इतरांसाठी धडपडणारा हा घटक कधीही जात, धर्म,पंथ,नातं पाहत नाही.आपलं घर वा-यावर सोडून प्रत्येकाच्या कुटुंबातला सदस्य असल्यासारखा अडचणीच्या काळात सर्वांना मदत करतो. मात्र संकटात धावणारा,मदत करणारा आपला पत्रकार बांधव केवळ कौतुकाची बातमी देण्यापुर्ताच आहे काय ...?* *यांनाही आर्थिक अडचणी असू शकतात,अश्या वेळी आपण ही सरकारकडे मागणी केली पाहिजे ना पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबाचा विचार करून ,पत्रकारानाही आर्थिक मदतीसाठी सरकारने आणि सर्व सामान्य नागरिकांनी  सामाजिक कर्तव्याचे भान ठेवून आर्थिक मदतीसाठी पावले उचलणे गरजेचे आहे ???*
*असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.*


मा.विजय दरेकर
*एक सर्व सामान्य वाचक*....✍🏻