सुरक्षित वेब कॉन्फरन्सिंगकरिता 'वीकॉन्फरन्स' लाँच

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


सुरक्षित वेब कॉन्फरन्सिंगकरिता 'वीकॉन्फरन्स' लाँच


~ क्लाउड कनेक्ट कम्युनिकेशन द्वारे अत्यंत सुरक्षित ऑडिओ, व्हिडिओ व वेब कॉन्फरन्सिंग समाधान सादर ~


मुंबई, २१ एप्रिल २०२०: कोव्हिड-१९ च्या उद्रेकामुळे ब-याच कंपन्यांनी रिमोट वर्किंग मॉडेलचा स्वीकार केला असून त्यांच्या टीमशी कनेक्ट होण्यासाठी बिझनेस अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी त्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सोल्यूशनवर अवलंबून राहण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात सुरुवात झालेली आणि इथेच वाढलेला क्लाउड कनेक्ट कम्युनिकेशन हे तंत्रज्ञानयुक्त आणि अतिशय सुरक्षित होमग्रोन सोल्युशन पुरवते.


या मंचाच्या वेबआरटीसी आधारीत आऑनलाइन कॉन्फर्नस रुममध्ये डेटा इनस्क्रिप्ट करण्यासाठी डेटाग्राम ट्रान्सपोर्ट लेअर सिक्युरिटी आणि सिक्युअर रिअल टाइम ट्रान्सपोर्ट प्रोटोकॉल या दोहोंचा वापर होतो. मॉडरेटर ओन्ली अॅक्सेस, वन टाइम पासवर्ड अँड पिन, कॉन्फरन्स रुम लॉक आणि यूझर ब्लॉकिंग फीचरच्या माध्यमातून हा मंच मॉडरेटरला अधिक सुरक्षित व्हर्चुअल कॉन्फरन्स रुम पुरवतो. १२८ बी इनक्रिप्शनद्वारे या प्लॅटफॉर्मवर व्हर्चुअल मीटिंगचा सर्वोत्कृष्ट दर्जा पुरवला जातो. सर्व सदस्यांकडून कंपनीच्या सर्व्हरवर मीडिया इनक्रिप्ट केला जातो, त्यामुळे सर्व व्हॉइस व व्हिडिओ कॉल्सदेखील पूर्णपणे इनक्रिप्ट केले जातात.


तसेच, एचटीटीपीएसद्वारे चॅट मेसेज पाठवते जातात व वेब सॉकेट्सद्वारे एसएसएल/टीएलएसवर येतात. हे दोन्हीही अत्यंत विश्वासार्ह व सुरक्षित प्रोटोकॉल आहेत. डेटा प्रायव्हसीचा दर्जा अत्युत्तम राखण्यासाठी वी कॉन्फरन्स कोणत्याही थर्ड पार्टी यूझरला डेटा शेअर करत नाही. अखेरीस २०१९ च्या पेन टेस्टनुसार, प्लॅटफॉर्मचे डेस्कटॉप अॅप इन्स्टॉलेशन व्हेराकोडने सुरक्षित केले जाते. सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून वीकॉन्फरन्स सर्व ग्राहकांना प्रायव्हसी प्रोटेक्शनमधील गोल्ड स्टँडर्ड असलेल्या जीडीपीआरचे नियम आणि तत्त्वांचे पालन करते.


या अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांसह, वी कॉन्फरन्स एआय नेतृत्वातील ट्रान्सक्रिप्शन, ऑडिओ व व्हिडिओ रेकॉर्डिंग, इँटिग्रेटेड डायल-इन्स, लाइव्ह व्हिडिओ स्ट्रिमिंग आणि १०० सदस्यांसह मीटिंग भरवण्याची नावीन्यपूर्ण सुविधाही पुरवते. यातील ऑटो टॅग फीचर हे ऑटोमॅटिकली रेकॉर्डिंग ट्रान्सस्कारइब करत तर स्मार्ट सर्च टूलद्वारे मीटिंग ट्रान्सक्रिप्शनमदील कीवर्ड शोधत येतात.


क्लाउडकनेक्ट कम्युनिकेशनचे सह संस्थापक व सीआरओ श्री रमण सिंग म्हणाले, ‘कोव्हि़ड-१९ च्या संकटामुळे अनेक संस्थांमधील बहुतांश कर्मचारी आता घरी राहून काम करत आहेत. भारतातील पहिले आणि एंड टू एंड क्लाउड व मोबाइल अॅप आधारीत पीबीएक्स आणि युनिफाइड कम्युनिकेशन सर्व्हिस प्रोव्हायडर या भूमिकेतून तंत्रज्ञानाधारीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सोल्युशनचा विकास ही आमची पहिली नैसर्गिक गरज होती. कंपन्यांना त्यांच्या बैठक आणि परिषदा विना अडथळा घेता याव्यात, यासाठी सुरक्षित सोल्युशन प्रदान करण्याचा उददेश वी कॉन्फरन्समागे होता.