पुणे प्रवाह न्युज पोर्टल
(पिंपरी, २४) मुस्लि म समाजातील रमाजानचा पवित्र महिना हा २५ एप्रियल पासून सुरू होत आहे, शनिवारी २५ तारखेला पहिला रोजा असून शुक्रवारी २४ तारखेला चंद्रदर्शनानंतर परंपरेनुसार तरावीहीची नमाज अर्थात कुराण पठण ला रोज रात्री इशाच्या नमाजनंतर सुरूवात होते.
सध्या केवळ भारतातच नव्हे तर, संपूर्ण जगात कोरोना व्हायरसच्या महाभयंकर आजारामुळे परिस्थिती गंभीर आहे. भारतात लॉक डाऊन सुरू आहे. अनेक भागात रूग्णांची संख्या अधिक असल्याने तिथे तो परिसर सील करण्यात आलेला आहे. नागरिकांनी एकत्र न येता घरातच थांबण्याचे आवाहन प्रशासनाच्या मार्फत होत आहे. त्यामुळे माझी तमाम मुस्लिरम समाजातील सर्व बांधवांना नम्र विनंती व आवाहन आहे की यंदाच्या वर्षीचा रमाजनाचा पवित्र महिना हा आपण सर्वांनी घरात थांबूनच साजरा करायचा आहे. सकाळी सहेरिला अथवा सायंकाळी रोजा इफ्तारला मस्जिजद मध्ये न जाता घरातच रोजा इफ्तार करायचे आहे, पाच वेळची नमाज व तरावीह ची नमाज ही देखील घरातच पठन करावयाची आहे. मस्जिथद मध्ये कोणीही जाऊ नये किंवा घराच्या गच्चीवर (टेरेस) वर एकत्र येऊन अथवा ग्रुपने नमाज पठण नाही करायचे. सर्वांनी घरात थांबण्याचे दृढ निश्चय केला तरच कोरोना व्हायरस हा या देशातून जाईल. येत्या २५ मे ला रमजान ईद आहे त्यामुळे पुढील एक महिना आपण सर्वांनी घरात थांबून अल्लाह कडे हा कोरोना व्हायरस भारतातून जाण्यासाठी दुआ करायची आणि हा व्हायरस संपूर्ण पणे हद्दपार झाल्यानंतर ईदचा उत्सव सालाबाद प्रमाणे सर्वांनी एकत्रित येऊन आनंदात साजरा करता येईल. रमजान महिन्यात जकात – फितरा या माध्यमातून गोरगरिबांना मदत करावी, गरजूंना अन्नधान्य, जेवणाची मदत करावी, हे सर्व करत असताना सोशल डिसस्टन्स चे पालन काटेकोर पाळावेत. असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रवक्ते फजल शेख यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
सदरची बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिध्द करावी ही विनंती.
कळावे,
आपला स्नेहांकीत,
फजल शेख
पक्ष प्रवक्ते तथा मुख्य सरचिटणीस