सर्व कार निःशुल्क तसेच इंधन आणि चालकांसहित उपलब्ध करून दिल्या जातील

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


कोरोना वॉरीयर्सच्या सुरक्षित प्रवासासाठी एमजी मोटर ‘१०० हेक्टर’ उपलब्ध करून देणार


सर्व कार निःशुल्क तसेच इंधन आणि चालकांसहित उपलब्ध करून दिल्या जातील


मुंबई, २२ एप्रिल २०२०: कोव्हिड-१९ च्या संकटकाळात मदतीचा हात पुढे करत एमजी मोटर इंडियाने मे २०२० च्या अखेरपर्यंत देशभरात सार्वजनिक सेवेसाठी डॉक्टर, चिकित्सा विभागातील कर्मचारी, पोलिस आणि स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांना ‘१०० एमजी हेक्टर’ वाहने प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. एमजी मोटर यूकेने कोव्हिड-१९ या साथीच्या आजाराशी लढण्यासाठी संपूर्ण ब्रिटनमध्ये एनएचएस एजन्सीना १०० एमजी झेडएस ईव्ही प्रदान करण्याचे वचन दिले आहे.


कोव्हीड-१९ च्या संकटातून बाहेर पडण्यासाठी राष्ट्रीय प्रयत्नांना पाठींबा देत एमजी मोटर इंडिया १०० हेक्टर नि:शुल्क प्रदान करतील. सर्व कार इंधन आणि चालकांसहित उपलब्ध करून दिल्या जातील. तसेच कोरोनाविरोधात भारताचे सुरु असलेले प्रयत्न अधिक वेगवान होतील. तसेच डॉक्टर, चिकित्सा विभागाचे कर्मचारी, पोलिस आणि स्थानिक प्रशासकीय अधिकारी हे फ्रंटलाइन वॉरिअर्स सुरक्षितरित्या प्रवास करू शकतील, याची हमी कंपनीतर्फे घेतली जाईल. राज्य सरकारच्या नियमानुसार, लॉकडाउन दरम्यान एमजीच्या राष्ट्रीय नेटवर्कद्वारे कार पुरवल्या जातील.


कार निर्माते या ‘१०० हेक्टर’ कार राष्ट्रीय सेवेत तैनात करण्यासाठी नुकत्याच सुरू झालेल्या एमजी डिसइन्फेक्ट अँड डिलिव्हर’ प्रक्रियेचे पालन करतील.


एमजी मोटर सध्या या साथीच्या काळात विविध समूहांना मदत करत आहे. कार निर्मात्याने व्हेंटिलेटर दान केले आहेत. तसेच कोरोना व्हायरसशी सामना करण्यासाठी आरोग्य व स्वच्छता किट, पीपीई किट, सर्जिकल मास्क, हातमोजे, सॅनिटायजर, सॅनिटायझर स्प्रेअर, खाद्य आणि रेशन किट वितरीत केले आहेत.


Popular posts
किल्ले सिंहगड मोहीम फत्ते*🚩🚩  ४ फेब्रुवारी १६७० रात्री गडावर तुंबळ लढाई झाली
Image
आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या 226व्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन...
Image
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व आमचे नेते युवराज भाऊ बनसोडे यांच्याशी पोलिस हुज्जत घालून
Image
कोलकातामध्ये डावे-भाजपा विद्यार्थी संघटना भिडल्या; दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीमार
स्टार बॉईज स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य हाफपिच क्रिकेट स्पर्धा बोपोडी येथे पारितोषिक समारंभ आयोजित करण्यात आला यावेळेस प्रमुख पाहुणे  मा श्री कैलासदादा गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
Image