फार्मसी प्राध्यापकांसाठी ऑनलाईन  प्रशिक्षण कार्यक्रम सोमवारपासून* 

पुठंणे प्रवाह न्युज पोश.


 


प्रेस नोट
*फार्मसी प्राध्यापकांसाठी ऑनलाईन  प्रशिक्षण कार्यक्रम सोमवारपासून*
पुणे :
महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या 'इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी' तर्फे  फार्मसी प्राध्यापकांसाठी ऑनलाईन  प्रशिक्षण कार्यक्रम(फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रॉग्रॅम ) सोमवारपासून आयोजित करण्यात आला आहे. सोमवार ,२० एप्रिल रोजी या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन होणार आहे ,२५ एप्रिल पर्यंत ते चालणार आहे.  या प्रशिक्षण कार्यक्रमाचे समन्वयक आणि  'इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी' चे प्राचार्य डॉ. व्ही.एन .जगताप यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. या प्रशिक्षणात डी -फार्म अभ्यासक्रमाचे   १०७८ प्राध्यापक सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र बोर्ड स्टेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन' च्या सहकार्याने हे प्रशिक्षण होणार असून दररोज दोन तास गुगल हॅन्गओउट आणि गॅलॅक्सी सॉफ्टवेअर द्वारे एक आठवडा सुरु राहणार आहे.                                   -------------------------------------------------------