पुणे.प्रवाह न्युज पोर्टल
प्रेस नोट
*फार्मसी प्राध्यापकांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमास चांगला प्रतिसाद* ----------------------------------------- *फार्मसी अध्यापनात रुची वाढविण्यासाठी नव तंत्रज्ञानाचा वापर उपयुक्त* : डॉ. विनोद मोहितकर , संचालक महाराष्ट्र बोर्ड स्टेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन
पुणे :
'कोरोना लॉक डाऊन काळात जग बदलत असून बदलत्या जगाला लागणाऱ्या फार्मसीचे ज्ञान वाढवायचे असेल तर फार्मसी संबंधी अध्यापनात नव तंत्रज्ञानाचा वापर करून वापर करून अध्ययन आणि अध्यापनाची रुची वाढवली पाहिजे 'असे प्रतिपादन संचालक महाराष्ट्र बोर्ड स्टेट ऑफ टेक्निकल एज्युकेशनचे संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी केले.
महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या 'इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी' तर्फे फार्मसी प्राध्यापकांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम(फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रॉग्रॅम ) सोमवारपासून आयोजित करण्यात आला आहे. सोमवार ,२० एप्रिल रोजी या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन झाले.
या प्रशिक्षण कार्यक्रमात डॉ. विनोद मोहितकर बोलत होते.
हा प्रशिक्षण वर्ग २५ एप्रिल पर्यंत चालणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे समन्वयक आणि 'इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी' चे प्राचार्य डॉ. व्ही.एन .जगताप यांनी स्वागत केले. या प्रशिक्षणात डी -फार्म अभ्यासक्रमाचे ११०० प्राध्यापक सहभागी झाले. महाराष्ट्र बोर्ड स्टेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन' च्या सहकार्याने हे प्रशिक्षण होत असून दररोज दोन तास यू ट्यूब लाइव्ह आणि गुगल क्लासरूम सॉफ्टवेअर द्वारे एक आठवडा सुरु आहे.
'आधुनिक माध्यमांद्वारे होत असलेले हे प्रशिक्षण अतिशय स्वागतार्ह पाउल असून कमी वेळ आणि कमी खर्चात हे प्रशिक्षण होण्याचा पायंडा पडत आहे . फक्त सहभाग महत्वाचा नाही ,तर नव्या तंत्रज्ञानाचा ठसा भविष्यावर ठसा उमटविण्यासाठी प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे'असे प्रतिपादन अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ पी ए इनामदार यांनी केले.ज्ञानासह कौंशल्य शिकणे आवश्यक आहे असेही त्यांनी सांगितले .
प्रमुख समन्वयक प्राचार्य डॉ. व्ही.एन .जगताप यांनी स्वागत करताना सांगितले कि प्रख्यात वक्ते आणि प्रदर्शनाद्वारे शक्य तितक्या चांगल्या ऑनलाईन प्रशिक्षणात सुसज्ज करण्यास कसर सोडणार नाही जेणेकरून तुम्ही तुमच्या करिअर आणि विकासाला आव्हानात्मक जीवनासाठी आकार देऊ शकाल.
डॉ. विनोद मोहितकर , संचालक महाराष्ट्र बोर्ड स्टेट ऑफ टेक्निकल एज्युकेशनयांनी सांगितले कि कोव्हीड 19 राष्ट्रीय लॉकडाऊन कालावधी दरम्यान प्रभावीपणे विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन गुंतवणूकीसाठी आभासी वर्ग तयार करण्यासाठी आयसीटी साधनांचा उपयोग करण्याबद्दल मूलभूत ज्ञान प्रदान करणे हा प्रोग्रामचा उद्देश आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीची पूर्तता ठेवत, फार्मसी डोमेनमधील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या अधिक रूचीसाठी आयसीटी टूल्सचा दररोज शिकविण्याच्या पद्धतींचा वापर केला पाहिजे. या ऑनलाईन एफडीपी कार्यक्रमाचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे शिक्षकांना विनामूल्य वेबिनार, व्हर्च्युअल वर्ग, ऑनलाइन अभ्यास साहित्य, प्रश्नपत्रिका निश्चित करणे, ऑनलाइन मूल्यांकन, ई-सामग्री डिझाइन इत्यादींसाठी विविध मूलभूत विशिष्ट सॉफ्टवेअर / आयसीटी साधनांच्या शिक्षणाबद्दल जागरूक करणे हा आहे. नंतर आझम कॅम्पसचा व्हर्च्युअल फेरफटका मारण्यात आला.
आजचे प्रमुख वक्ते डॉ. सतीश पोलशेट्टीवार हेड ऑफ फार्मासुटिक्स यांनी औद्योगिक क्रांती, डिजिटल तंत्रज्ञानाची संभाव्यता हानी, वैयक्तिकृत डेटा, ओपन सोर्स सामग्री, क्वालिटी बाय डिझाईन इन एजुकेशन, मॉडर्न पेडोगॉजीसाठी अभिनव शिक्षण रणनीती, शिक्षण पद्धती ४.0, ग्नोमिओ, मूडल, स्वयं, ओ लॅब्स, ब्लूमच्या वर्गीकरणाचा वापर करून फार्मसीचे प्रश्नपत्रिका कसे सेट करावे याची सविस्तर माहिती दिली.
प्रश्न उत्तर सत्रामध्ये सर्व प्राध्यापकांनी उस्फुर्तपणे सहभाग दाखवला आणि इन्स्टिटयूट ऑफ फार्मसायच्या सर्व टीम चे अभिनंदन केले. सुमारे अडीच हजार प्राध्याकानी या कार्यक्रम ऑनलाईन पहिला.
-----------------------------------------------