कर्वेनगर वारजे क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना फेस शील्ड मास्क प्रदान*.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*कर्वेनगर वारजे क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना फेस शील्ड मास्क प्रदान*.


*कोरोनाच्या संसर्गापासून बचावासाठी मास्क सोबतच फेस शील्ड उपयोगी - राजेश कुलकर्णी*.


*रस्त्यावर काम करणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची काळजी घेण्याचा क्रिएटिव्ह फौंडेशन चा निर्धार - संदीप खर्डेकर*.


घरगुती मास्क किंवा मेडिकल मास्क परिधान केल्याशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदीं सह सर्वच क्षेत्रातील मान्यवर व वैद्यकीय क्षेत्रातून केले जात आहे.दैनंदिन वापरातील मास्क सह प्रत्यक्ष फील्ड वर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अधिक सुरक्षा मिळावी यासाठी कीट्रॉनिक्स कंपनीने फेस शील्ड तयार केले आहेत.आज भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने कीट्रॉनिक्स चे संचालक राजेश कुलकर्णी यांनी क्रिएटिव्ह फौंडेशनच्या माध्यमातून वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयातील ७५ कर्मचाऱ्यांना फेस शिल्ड प्रदान केले. यावेळी सहाय्यक आयुक्त संतोष वारुळे,नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,क्रिएटिव्ह फौंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर व इतर कर्मचारी उपस्थित होते.
जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना सुरक्षितरित्या त्यांचे दैनंदिन काम करता यावे यासाठी क्रिएटिव्ह फौंडेशन प्रयत्नशील असून अधिकाधिक स्वच्छता कर्मचाऱ्यांना फेस शिल्ड देण्यात येणार आहेत असे क्रिएटिव्ह फौंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले.क्रिएटिव्ह फौंडेशन स्वच्छता कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर,मास्क,हॅंड ग्लोव्हज व इतर सुरक्षा साधन पुरवून त्या माध्यमातून सुरक्षित सेवा देण्यासाठी कोरोना संकटाच्या काळात कार्य करत आहे असे ही ते म्हणाले.
नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी विपरित परिस्थितीत ही कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यनिष्ठेचे कौतुक करतानाच त्यांच्या आरोग्याचे रक्षण करणे ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी असल्याचे सांगितले व राजेश कुलकर्णी यांनी तयार केलेल्या फेस शिल्ड बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
आपला,
*संदीप खर्डेकर*.
अध्यक्ष,क्रिएटिव्ह फौंडेशन.