पुणे प्रवाह न्युज पोर्टल
बांधकाम साईट्सवर अडकलेल्या बांधकाम मजुरांना भोजन
पुणे, दिनांक 31- ‘लॉकडाऊन’मुळे पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील बांधकाम साईट्सवर अडकलेल्या बांधकाम मजुरांना एक वेळचे भोजन देण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. आज 19 वाहनांतून 95 साईट्सवरील 15 हजार 869 मजुरांना भोजन उपलब्ध करुन देण्यात आले. कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील मार्गदर्शनानुसार जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी कामगार विभागाच्या मदतीने ही सोय केली. ‘क्रेडाई’ या संस्थेकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार तसेच बांधकाम मंडळाकडे नोंद असलेल्या मजुरांना अटल आहार योजनेंतर्गत माध्यान्ह भोजन देण्याची योजना आहे. जिल्हाधिकारी राम यांच्या निर्देशानुसार बांधकाम साईट्सवरील सर्वच मजुरांना भोजन देण्यात येत आहे. ही संख्या 30 हजारांपर्यंत वाढण्याची शक्यता अपर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ यांनी व्यक्त केली.