सर्वधर्मीय २०० कुटुंबांना १५ दिवसांचे जीवनोपयोगी साहित्याचे वितरण            हाजी गुलाम महंमद आझम ट्रस्ट चा उपक्रम....  घरीच नमाज पठण करावे :डॉ.पी.ए.इनामदार यांचे आवाहन   

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


प्रेस नोट 
सर्वधर्मीय २०० कुटुंबांना १५ दिवसांचे जीवनोपयोगी साहित्याचे वितरण                                    ------------------------------------------                                                               हाजी गुलाम महंमद आझम ट्रस्ट चा उपक्रम                                                                                        ----------------------------                                                                                                         घरीच नमाज पठण करावे :डॉ.पी.ए.इनामदार यांचे आवाहन  
------------------                                                                                              निजामुद्दीन तबलिग जमात बाबत गैरसमज पसरवू नये :डॉ.पी.ए.इनामदार यांचे आवाहन   


पुणे :
कोरोना विषाणू साथीच्या आणि लॉक डाऊन च्या  पार्श्वभूमीवर आझम कॅम्पस शैक्षणिक परिवार आणि हाजी गुलाम महंमद आझम ट्रस्ट च्या वतीने गरीब आणि गरजू वर्गातील सर्वधर्मीय २०० कुटुंबांना १५ दिवसांचे जीवनोपयोगी साहित्याचे वितरण करण्यात येत आहे. ३१ मार्च पासून या उपक्रमाला सुरुवात झाली असून आझम कॅम्पस येथे दररोज या कुटुंबांना टप्प्या टप्प्याने बोलावून मदत दिली जात आहे. आज १ एप्रिल रोजी देखील सकाळी ११ वाजता आझम कॅम्पस च्या असेम्बली हॉल मध्ये मदतीचे वितरण करण्यात आले. डॉ पी ए इनामदार यांच्या हस्ते या कुटुंबाना जीवनोपयोगी साहित्य देण्यात आले. त्यात अन्नधान्य,पीठ ,तेल ,चहा ,साखर इत्यादी घटकांचा समावेश आहे. २०० घरातील  प्रत्येकी ५ जणांना १५ दिवस पुरेल इतका शिधा देण्यात येत आहे . यासाठी ट्रस्ट ने २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. 
यावेळी अवामी महाज संघटनेचे पदाधिकारी ,सामाजिक कार्यकर्ते  वहाब शेख ,वाहिद बियाबानी,शाहिद शेख,मश्कुर शेख,एड . आईन अश्रफी  शेख,मुनव्वर आरिफ सय्यद ,बद्रुद्दीन शेख ,बबलू शेख,डॉ मुश्ताक मुकादम उपस्थित होते.  'संकटाच्या वेळी सर्व धर्मियांनी एकत्र येऊन मुकाबला  करणे  गरजेचे असून  'आहे रे ' वर्गाने या संकटात 'नाही रे ' वर्गाकडे लक्ष दिले पाहिजे. तीच भारतीय संस्कृतीची शिकवण आहे,असे डॉ पी ए इनामदार यांनी यावेळी बोलताना सांगितले .
घरीच नमाज पठण करावे :डॉ .पी .ए .इनामदार यांचे आवाहन --------------------------
कोरोना विषाणू साथीच्या आणि लॉक डाऊन च्या  पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंन्सिंग ठेवणे आवश्यक असून मशिदींमध्ये सामूहिक नमाज पठण न करता घरीच वैयक्तिक पातळीवर नमाज पठण करावे,असे आवाहन  महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष  डॉ पी ए इनामदार यांनी यावेळी बोलताना केले . आझम कॅम्पस शैक्षणिक परिवार आणि हाजी गुलाम महंमद आझम ट्रस्ट च्या वतीने गरीब आणि गरजू वर्गातील सर्वधर्मीय २०० कुटुंबांना १५ दिवसांचे जीवनोपयोगी साहित्याचे मोफत  वितरण करण्यात येत आहे.या मदतीच्या वितरण प्रसंगीं पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे आवाहन केले.राज्यात ,पुण्यात सर्व मशिदींमधील ,सोसायटीमधील सामूहिक नमाज पठण थांबविण्यात आले आहे . सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिसांच्या मदतीने  आपण प्रयत्न करून सामूहिक पठण आताच्या परिस्थितीत योग्य ठरणार नसल्याचे पटवून दिलेले आहे ,असेही डॉ इनामदार यांनी सांगितले . पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व परिस्थिती व्यवस्थित हाताळत आहेत,सर्वांनी या प्रयत्नांना साथ द्यावी . 
निजामुद्दीन तबलिग जमात बाबत गैरसमज पसरवू नये :डॉ .पी .ए .इनामदार यांचे आवाहन 
  दिल्ली निजामुद्दीन येथील तबलिग जमात एकत्रीकरणाची रीतसर परवानगी आयोजकांकडे होती . लॉक डाऊन आवाहनानंतर आयोजकांनी तेथे जमलेल्या मुस्लिम भाविकांना त्यांच्या गावी परत जाण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाशी लेखी पत्रव्यवहार केला होता .मात्र ,धोरणात स्पष्टता नसल्याने भाविकांना तेथून बाहेर पडण्याविषयी प्रशासनकडून सूचना मिळू शकल्या नाहीत . कोरोना विषाणू साथी च्या पार्श्वभूमीवर वेळोवेळी संयोजक पोलीस आणि प्रशासनाच्या संपर्कात होते . त्याचे सर्व पुरावेही संयोजकांनी दिले आहेत . निजामुद्दीन तबलिग जमात बाबत गैरसमज पसरवू नये,असे आवाहन ही डॉ. पी . ए . इनामदार यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना केले . 
---------------------------------------------------------------                                            ANC - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोरोनाला थोपविण्याकरता जे  आव्हान पेललय त्याला साथ देण्याकरता  कटीबध्द असुन २०० गरीब कुटुंबाना  महाराष्ट्र काँस्मोपाँलेटीन एज्युकेशन सोसायटी  आणि हाजी गुलाम महम्मद आझम एजुकेशन ट्रस्ट च्यावतीने जीवनोपयोगी साहित्य ,अन्नधान्यचे वाटप करण्यात आले.


  VO - कोरोनामुळे देशासह राज्यात संचारबंदी असुन नागरिकांना बाहेर पडणे  जिकीरीचे झाले आहे. त्यातच जे रोजदारीवर काम करतात अशांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडली असुन त्याना मदतीचा हात देण्याकरता समाजातील दानशुर संस्था,व्यक्ती पुढे येत आहे.  हाजी गुलाम महम्मद आझम एजुकेशन ट्रस्ट च्यावतीने शहरातील २०० कुटुंबांना  पंधरा दिवस पुरेल इतके अन्नधान्य संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी.ए इनामदार यांच्या  हस्ते देण्यात आले.


बाईट - डॉ . पी . ए .इनामदार ,अध्यक्ष   


--------------------------------------------------------------------