⭕दोन पोलिस स्टेशनचा क्राईम ( गुन्हे )विभाग संभाळून ‼ हम भी कुछ कम नही ‼ महिला पोलिस कर्मचार्याने दिले दाखवून..... 🅾सोलापुरः(मंगळवेढा

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


⭕दोन पोलिस स्टेशनचा क्राईम ( गुन्हे )विभाग संभाळून
‼ हम भी कुछ कम नही ‼
महिला पोलिस कर्मचार्याने दिले दाखवून.....


🅾सोलापुरः(मंगळवेढा/वार्ताहर)


 मंगळवेढा येथील उपविभागीय पोलिस कार्यालयातील महिला पोलिस कर्मचारी वंदना आयरे ह्या  मंगळवेढा व सांगोला या दोन पोलिस स्टेशनचा क्राईम ( गुन्हे )विभाग गेल्या तीन  वर्षापासून संभाळत आहेत.दरम्यान,क्राईम( गुन्हे ) विभाग संभाळताना पुरुष पोलिस  कर्मचार्‍यांनाही घाम फुटत असताना एक महिला पोलिस उत्कृष्ठ काम करून  
‼हम भी कुछ कम नही ‼
हे दाखवून देत असल्याने त्यांचे  कार्यालयीन कामकाजात कौतूक होत आहे.
मंगळवेढा येथे सन 2006 मध्ये पोलिस उपविभागीय कार्यालयास मंजूरी मिळाली.या कार्यालयात मंगळवेढा व सांगोला या दोन पोलिस स्टेशनचा कारभार पाहिला जातो.सन 2017 पासून या कार्यालयात क्राईम ( गुन्हे )विभागासाठी महिला पोलिस वंदना आयरे यांची नेमणूक झाली.सर्व पुरुष पोलिस कर्मचारी असताना एक महिला कर्मचारी उत्कृष्ठपणे क्राईम संभाळत आम्ही महिलाही माघे नाहीत हे कामकाजावरून दाखवून दिले जात आहे. आत्तापर्यंत त्यांनी मंगळवेढा,सांगोला या दोन पोलिस स्टेशनचे क्राईम ( गुन्हे )रेकॉर्ड अपडेट ठेवले असून यामध्ये वार्षिक तपासणी अहवाल, दैनंदिन गुन्ह्याच्या नोंदी, वरिष्ठ कार्यालय पत्रव्यवहार आदींच्या नोंदी संगणकावर बिनचूक ठेवले आहेत.क्राईम ( गुन्हे )विभाग हा पोलिस स्टेशनचा आत्मा समजला जातो. वर्षभर घडलेल्या गुन्ह्यांच्या नोंदी व्यवस्थित करून ठेवणे ही फारच महत्वाची जबाबदारी असते.  क्राईम ( गुन्हे )विभागाचे कामकाज पाहण्यासाठी पुरुष पोलिस कर्मचारीसुध्दा धजावत नाहीत.दरम्यान  गुन्ह्यांची वर्षभराची आकडेवारी याचा ताळमेळ घालणे ही फारच मोठी कसरत असल्याने भल्या भल्यांना हा विभाग संभाळताना अंगाला घाम फुटत असताना एक महिला पोलिस कर्मचारी ही गेली तीन वर्षे हे बिनचूकपणे आपले कर्तव्य (कामकाज )करत आहे.मागील तीन महिन्यापुर्वी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक डॉ.सुहास वारके यांनी डी.वाय.एस.पी.कार्यालयाला भेट दिली असता अपडेट क्राईम ( गुन्हे )विभागाचे कामकाज पाहून आयरे यांना प्रशस्तीपत्रक देवून गौरविले होते.आयरे हया सन 2007 च्या बॅचच्या असून  मंद्रूप,सोलापूर व मंगळवेढा पोलिस स्टेशन येथे कामकाज केले आहे.


⭕ओळी - येथील पोलिस उपविभागीय कार्यालयात क्राईम विभागातील संगणकावर कामकाज करीत असताना महिला पोलिस वंदना आयरे छायाचित्रात दिसत आहेत.(छाया-शिवाजी पुजारी,मंगळवेढा)
--------------