मेट्रोचे काम करणाऱ्या कामगार बांधवांना कार्तिक ग्रुप ऑफ कंपनीच्यावतीने  जेवणाची पाकिटे  वाटप

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


हाता वरचे पोट असणा-या बांधवांना व डेक्कन जिमखाना येथील मेट्रोचे काम करणाऱ्या कामगार बांधवांना कार्तिक ग्रुप ऑफ कंपनीच्यावतीने  जेवणाची पाकिटे  वाटप कार्तिक ग्रुप ऑफ कंपनीच्या कार्यकारी संचालिका अँड मोनिका खलाणे यांच्याहस्ते करण्यात आले .

   जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यात संपुर्णत:लॉक डाऊन असल्याने सोशल डिस्टन्सी म्हणून सर्व कामे ठप्प आहेत. या मुळे ज्या गरीबांची रोजीरोटी दिवसभर काम करून मिळणा-या आमदानीवर चालते अशांवर उपासमारीची वेळ आली असून. यासाठी  कार्तिक ग्रुप ऑफ कंपनीच्यावतीने  शहरात गेले अनेक दिवसांपासून  जेवणाची पाकिटे वाटण्यात आली .