दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमात सहभागी एकजण पाथरीच्या रुग्णालयात निगराणीखाली

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमात सहभागी एकजण पाथरीच्या रुग्णालयात निगराणीखाली
__________________________________


दिल्ली येथे धार्मिक कार्यक्रमाहून परतलेल्या एकास प्रशासनाने 2 एप्रिल रोजी रात्री उशिरा आरोग्य तपासणी करून होम कोरान्टीन केले होते. त्यानंतर काल दुपारी 2 वाजेच्या सुमारास आरोग्य विभागाने पोलिसांच्या मदतीने  पाथरी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या आयसोलेशन कक्षात  त्याला दाखल केले.


पाथरी येथील मुस्लिम समाजातील एक जण धार्मिक कार्यक्रमानिमित्ताने 1 जानेवारी ते 4 मार्च 2020 या काळात दिल्लीत वास्तव्यास होता. कोरोनाचा विषाणूचा पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार 3 एप्रिल रोजी त्या इसमास तहसील कार्यालयात बोलावून घेत कुटुंबातील सद्स्य यांची हिस्ट्री माहीत करून घेत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ सुमंत वाघ यांनी येथील ग्रामीण रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात दाखल केले आहे. तसेच त्याचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला आहे अशी माहिती डॉ सुमंत वाघ यांनी दिली.