अन्नदानासाठी आवाहन !*   *स्वरूप सेवा व गिरिप्रेमी चा* *राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व जनकल्याण समितीच्या मदत कार्यात सहभाग.* 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*अन्नदानासाठी आवाहन !* 
 *स्वरूप सेवा व गिरिप्रेमी चा* *राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व जनकल्याण समितीच्या मदत कार्यात सहभाग.* 


*सप्रेम नमस्कार* 🙏
एका वेगळ्या संकटाशी आपण सर्व मुकाबला करतो आहोत. आलेलं संकट खूप मोठं आहे. या परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी सरकारला देशभर लॉकडाऊन, वाहन बंदी, संचारबंदी असे कठोर उपाय अंमलात आणावे लागले. परिणाम स्वरूप हातावर पोट अवलंबुन असणाऱ्या गरीब कष्टकरी, मजूर कुटुंबांना उपासमारीला सामोरं जावं लागतंय. आपले बांधव उपाशी आहेत हे सत्य स्वीकारणं अवघड आहे. त्यांना मदत करणं, या संकट समयी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहणं ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. या जबाबदारीचं भान राखत स्वरूपसेवा व गिरिप्रेमी संस्थांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व जनकल्याण समितीच्या *सिंहगड रस्ता परिसरातील* मदतकार्यात सहभागी व्हायचं ठरवलं आहे. *संघ व जनकल्याण समितीच्या वतीने श्री.मंगेश पाटील मो.9860367066 व श्री.विशाल कडूसकर मो.9921519750* हे सिंहगड रस्ता परिसरातील गरीब वस्त्यांमधील गरजुंना मदतकार्याचं व्यवस्थापन पाहत आहेत. श्री.विशाल कडूसकर हे गिरिप्रेमीचे व स्वरूप सेवा चे  सभासद आहेत. करोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून मदतकार्य करत असताना सुद्धा सोशल डिस्टनसिंग राखावं लागतंय. मदतकार्याचं स्वरूप व व्यवस्थापन कसं होतं याची माहिती खाली विस्ताराने दिली आहे.
1.वरील स्वयंसेवक सिंहगड रस्ता परिसरातील गरीब वस्तीला प्रत्यक्ष भेट देऊन गरजूंची माहिती घेतात. 
2.त्याच वस्तीतील योग्य किराणा दुकानदाराशी संपर्क साधून त्याला गरजू कुटुंबांची यादी दिली जाते.
3.वस्तीतील गरीब कुटुंबांना समितीच्या वतीने एक कुपन दिले जाते. यात दिल्या जाणाऱ्या शिध्याचा तपशील नोंद केलेला असतो.
4.या कुटुंबांनी त्यांच्या वस्तीतील सदर दुकानात वरील कुपन दिल्यानंतर, दुकानदार जनकल्याण समितीने ठरवून दिलेला शिधा या गरजूंना देतो.
5.सदर दुकानदाराकडून वस्तीतील कुटुंबांनी दिलेली सर्व कुपन्स गोळा करून झालेल्या एकूण बिलाची रक्कम संघ व जनकल्याण समितीच्या वतीने वरील स्वयंसेवक त्या दुकानदारास रोख स्वरूपात देतात.
6.एका कुपनवर या कुटुंबाला दिल्या जाणाऱ्या शिध्याचा तपशील ---
गव्हाचे पीठ 5 किलो
तांदूळ 2 किलो
तूर डाळ 1 किलो
तेल 1 लिटर
साखर 1 किलो
चहा पावडर - 100 gm.
बारीक मीठ - 1 किलो
मसाले-(हळद-50gm, तिखट-100gm,मोहरी-100 gm)


*एका कुटुंबाला दिल्या जाणाऱ्या शिध्याची रक्कम साधारणतः 700 रुपये इतकी होते.* सध्याच्या बिकट परिस्थितीत आपल्या घासातला एक घास या गरीब बांधवांना द्यायला हवा. या मदतकार्यात स्वरूपसेवा व गिरिप्रेमी संस्था सहभागी होत आहे. या साठी आपल्या मदतीची आम्ही अपेक्षा करतो आहोत. *स्वरूपसेवा व गिरिप्रेमी संस्था आपणास अन्नदानासाठी आवाहन करीत आहे. आम्ही आपणाकडून या जीवनावश्यक वस्तूंच्या एका किंवा अधिक संचांसाठी आर्थिक मदतीची अपेक्षा करतो आहोत.* आपल्या सहभागासाठी आपण आमच्याशी संपर्क साधू शकता. *स्वरूपसेवा संस्थेचा बँक तपशील शेवटी दिला आहे.* करोना विषाणूच्या संकटाशी आपण सर्व एकत्रितपणे धीरोदात्तपणे सामना करूयात.


आपले नम्र,
🙏🙏🙏
*अजित पटेल*
*कार्यवाह, स्वरुपसेवा, पुणे*
*मो. 9850093302*


*कौस्तुभ ठकार*
*स्वरूपसेवा, पुणे*
*मी. 9822842063*


*गणेश मोरे*
*कार्यवाह, गिरिप्रेमी, पुणे*


*अमित तळवलकर*
*गिरिप्रेमी, पुणे*
*मो.9860632612*


Swaroopseva
*IDBI BANK*
*A/C. 50210010010007*
IFSC CODE. IBKL0000502
BRANCH - APTE ROAD DECCAN GYMKHANA
PUNE