माईर्स एमआयटीच्या पॉलिटेक्निक कडून कर्तव्यदक्ष पोलिसांना वाटले 8000 पाणी बॉटल 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


कृपया प्रसिद्धीसाठी      दिनांक: 24/4/2020



माईर्स एमआयटीच्या पॉलिटेक्निक कडून कर्तव्यदक्ष पोलिसांना वाटले 8000 पाणी बॉटल


पुणे, दिनांक, 24 एप्रिल: संपूर्ण जगामध्ये थैमान घातलेल्या जिवघेण्या कोरोनाला पुण्यात प्रतिबंध घालण्यासाठी पुणे पोलीस दलातील सर्व कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहेत. त्यांच्याप्रती सामाजिक बांधिलकी जपत माईर्स एमआयटी तंत्रनिकेतन मधील सर्व शिक्षक व विद्यार्थी असोसिएशनच्या  वतीने कोथरूड येथील शास्त्रीनगर पोलीस चौकीला आठ हजार पाणी बॉटल वितरित केले.
हा उपक्रम एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड व कार्यकारी अध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या मार्गदर्शनात पार पाडण्यात आला. या वेळी विद्यार्थी असोसिएशनचे प्रतिनिधी तनिष कुलकर्णी व निरव परवाल यांनी पुढाकार घेतला होता. विध्यार्थीच्या या कार्याबद्दल संस्थेच्या प्राचार्य डॉ. रोहिणी काळे ,सर्व विभाग प्रमुख व शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले. अशी माहिती एमआयटी तंत्रनिकेतनचे समन्वयक प्रा. डॉ. सुनील कराड यांनी दिली.


जनसंपर्क विभाग
माईस एम .आय. टी, पुणे


Popular posts
आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या 226व्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन...
Image
किल्ले सिंहगड मोहीम फत्ते*🚩🚩  ४ फेब्रुवारी १६७० रात्री गडावर तुंबळ लढाई झाली
Image
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व आमचे नेते युवराज भाऊ बनसोडे यांच्याशी पोलिस हुज्जत घालून
Image
कोलकातामध्ये डावे-भाजपा विद्यार्थी संघटना भिडल्या; दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीमार
स्टार बॉईज स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य हाफपिच क्रिकेट स्पर्धा बोपोडी येथे पारितोषिक समारंभ आयोजित करण्यात आला यावेळेस प्रमुख पाहुणे  मा श्री कैलासदादा गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
Image