पुणे मनपा परिसरातील नागरी सर्वेक्षण व आरोग्य तपासणी युद्धपातळीवर,

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


कृपया प्रसिद्धीकरिता १२/०४/२०२०,
पुणे मनपा परिसरातील नागरी सर्वेक्षण व आरोग्य तपासणी युद्धपातळीवर,
पुणे मनपा परिसरातील नागरिक सर्वेक्षण व नागरिकांची आरोग्य तपासणी व जनजागृतीकरिता मनपाचे वतीने युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत,
पुणे महानगरपालिकेच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांच्या पथकातील कर्मचारी  घरोघरी जाउन नागरिकांना मार्गदर्शन करतानाच घरातील व्यक्तींची माहिती,थंडी,ताप,खोकला,व कोरोना विषाणू प्रादुर्भाव संशयित रुग्ण,बाधित लक्षणे,याबाबत मार्गदर्शन तसेच विलगिकरण,विलगिकरणाच्या कालावधीत घायव्याची काळजी, याकरिता मनपाने केलेल्या सोयी सुविधा, परदेशी प्रवास करून घरी आलेली व्यक्ती,परदेशी व्यक्तींच्या घरी कामास जाणाऱ्या व्यक्ती, त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती, घरी करावयाचे विलगिकरण,मनपाने विलगिकरणाकरिता केलेल्या व्यवस्था,अशा विविध माहिती सह मार्गदर्शन केले जात आहे,
" डॉ,आपल्या दारी "", या उपक्रमाअंतर्गत पुणे मनपा व भारतीय जैन संघटना व टाटा मोटर्स यांच्या संयुक सहभागाने पुणे मनपा परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी करीत आहेत,
कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंध उपाययोजने अंतर्गत " डॉ,आपल्या दारी", उपक्रमाअंतर्गत शहराच्या विविध भागात मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅनच्या साहाय्याने १२, व्हॅन फिरत आहेत,प्रत्येक व्हॅन सह १ डॉक्टर,१ नर्स,१ रेडिओग्राफर,२ कर्मचारी आहेत,
सद्धयस्थितीत संचारबंदीच्या कालावधीत बाहेर जाउन आरोग्य तपासणी,औषध उपचार करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम प्रभावी ठरलेला आहे,
जेष्ठ नागरिक सोसायटी,निवारा केंद्रे,मनपा शाळातून केलेल्या निवारा सुविधा,बेरोजगार,निराश्रित यांच्या निवारा ठिकाणी,झोपडपट्टी परिसर अशा परिसरातील नागरिकांसाठी ही सुविधा लाभदायी ठरलेली आहे,
मनपा रुग्णालये, डॉ,आपल्या दारी,मनपा १५,क्षेत्रीय कार्यालये,विविध रुग्णालये डॉ,नायडू रूग्णालय, व परिमंडळ निहाय तपासणी केंद्रे व मनपाच्या विविध विभागांच्या वतीने दिवस रात्र युद्धपातळीवर प्रभावी कामकाज केले जात आहे,
--संजय मोरे,
माहिती व जनसंपर्क अधिकारी
पुणे महानगरपालिका,
१२/०४/२०२०,


Popular posts
शितल पेट्रोल पंप ते लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक(कमेला चौक) पर्यंतच्या मुख्य रोडवरील *रस्ता दुभाजक* साफ करून त्या ठिकाणी सुदंर असे रंगीबेरंगी फुलाचे रोपे लावण्याचे काम उद्यान विभागाकडून सुरू आहे.
Image
जय शिवसमर्थ पतसंस्थेच्या दिनदर्शीकेचे नगरसेवक विशाल धनवडे यांच्या हस्ते प्रकाशन.
अभिनेता - कलाकार  सागर वासुदेव भोगे यांना कोविड १९ कोरोना 2020 महायोद्धा -  (KOVID CORONA WARRIORS 2020 )  या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
Image
Fabric rayon Size M to xxl
Image
लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांनी दक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला भेट दिली