पुणे प्रवाह न्युज पोर्टल
*पुणे पोलिसां साठी ४०० फेस शील्ड तर वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयासाठी २०० फेस शिल्ड प्रदान*
पुणे पोलिस जीवाची बाजी लावून पुणेकरांसाठी लढत आहेत ,स्वतःच्या आरोग्याची / कुटुंबीयांची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत.अश्या परिस्थितीत त्यांची काळजी घेणे ही आपली जबाबदारी असून याच भावनेतून कीट्रॉनिक्स चे राजेश कुलकर्णी आणि क्रिएटिव्ह फौंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक मोराळे साहेब यांची भेट घेउन ४०० फेस शिल्ड त्यांच्या सुपूर्द केले.तसेच या कठीण प्रसंगी पुणे पोलिसांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन ही त्यांनी दिले.पुणेकर उत्तम सहकार्य करत असून सर्वांच्या सहकार्याने आपण कोरोना विरुद्धचे युद्ध नक्कीच जिंकू असे मत अशोक मोराळे साहेबांनी व्यक्त केले.त्यांनी स्वतः फेस शिल्ड चा वापर करुन पोलिस मास्क सह याचा ही वापर करतील असे आश्वस्त केले.
तसेच वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या फील्ड वरील कर्मचाऱ्यांसाठी ही आज २०० फेस शिल्ड क्षेत्रीय अधिकारी संतोष वारुळे यांना सुपूर्द करण्यात आले.
योग्य व्यक्तीं पर्यंत वस्तू पोहोचाव्यात आणि खऱ्या गरजूंना मदत व्हावी यासाठी क्रिएटिव्ह फौंडेशन माध्यम म्हणून काम करत असून अनेक दानशूर अश्या स्वरूपात मदत करायला पुढे येत आहेत असे क्रिएटिव्ह फौंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी सांगितले.
या सर्व फेस शिल्ड उद्योजक श्री. नंदकुमार माने यांनी स्पॉनसर केल्याचे राजेश कुलकर्णी यांनी सांगितले.
आपला,
*संदीप खर्डेकर*
अध्यक्ष क्रिएटिव्ह फौंडेशन.