लाॕकडाऊनमुळे अडचणीत असलेल्या आॕटो रिक्षा चालक मालकाच्या पाठीमागे खंबीर पणे उभे राहण्या बाबत.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


जय जिजाऊ...


प्रती,
मा. मुख्यमंत्री /
मा. परिवहन राज्य मंत्री, महाराष्ट्र.


विषय :- लाॕकडाऊनमुळे अडचणीत असलेल्या आॕटो रिक्षा चालक मालकाच्या पाठीमागे खंबीर पणे उभे राहण्या बाबत.


आज लाॕकडाऊनमुळे पुण्याची लाईफलाईन असलेली  ऑटो रिक्षा सध्या बंद असल्यामुळे चालक-मालक संकटात आहे. कोरोना सारखे संकट अवघ्या जगभर पसरले असताना सगळीकडे कोरोनाचा आहाकार माजला असताना संकट काळात अॕटो रिक्षा वाल्यांच्या मदतीला कोणीही धावून येताना दिसत नाही. बँकेकडून कर्ज स्वरूपात घेतलेली रिक्षावाल्याचे हातावरचे पोट असलेल्या या रिक्षा वाल्याची परिस्थिती आज खुपच भयंकर अडचणीत येऊन सापडली आहे. दिवस भर रिक्षा चालवून संपुर्ण कुटुंब चालवणारा हा रिक्षा चालक आज अक्षरशः पोरका होऊन पडला आहे. तरी आपण या भयानक संकटात सापडलेल्या *१)* रिक्षा चालक मालकास किमान ५००० रू. मानधन द्यावे आणि *२)* १ वर्षा करीता गाडी पासिंग करीत लागणारा ईशुरन्स (विमा) माफ करण्यात यावा. तसेच *३)* बँकेचे दोन महिन्याचा कर्ज हप्ता माफ करावा. आज राज्यात साधारणपणे ७ लाख रिक्षा परवाने असून पुणे शहरात अंदाजे ८० हाजाराच्या आसपास परवाने आहे. त्यावर रिक्षावाल्यांचे कुटुंब चालत आहे तरीही आपण याकडे जबाबदारी पुर्वक लक्ष घालून या तीन चाकी 'अॕटो रिक्षा' चालक मालकाच्या योग्य मागणीचा विचार करून सहकार्य करावे ही विनंती.*


🚩🚩


*आपला*
- मंदार रविंद्र बहिरट,
*जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड वाहतूक संघटना*