माध्यमातील कर्मचारी व पत्रकारांना शासनाने  त्वरित विमा जाहीर करावा

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


कोराणाच्या संकटामुळे संपूर्ण जनता लॉक डाऊन मध्ये घरी सुरक्षित असताना शासनाकडून येणारे सूचना तसेच कोरोना संदर्भातील प्रत्येक बातमी व मदत याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या माध्यमातील कर्मचारी व पत्रकारांना शासनाने  त्वरित विमा जाहीर करावा

 

 

     कोरोणाच्या संकटामुळे संपूर्ण जनता लॉकडाऊन मध्ये घरी सुरक्षित असताना उच्चस्तरीय अधिकारी, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस, पत्रकार,  मिडीया हे मात्र जिवाची पर्वा न करता अहोरात्र कष्ट करून कोरोना संदर्भात उपचार व जनजागृती करीत आहेत. शासनाने सरकारने कोरोणाच्या काळात काम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचारी व पोलिसांना शासनाने  विमा जाहीर केला आहे. परंतु कोरोणा संदर्भातील प्रत्येक घटना जनसामान्यांपर्यंत योग्यरित्या पोहोचवावी याकरिता दिवस-रात्र झटून माध्यमांमध्ये काम करणारे कर्मचारी, पत्रकारांना, वृत्तपत्र विक्रेता, वृत्तपत्र टाकणारे कर्मचारी यांना कोणताही विमा जाहीर करण्यात आलेला नाही

       तरी कोरोणाच्या पार्श्वभूमीवर जिवाची पर्वा न करता शासनाकडून येणारे सूचना व कोरोणा संदर्भातील प्रत्येक बातमी तसेच दिली जाणारी मदत ची माहिती सतत जनसामान्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या माध्यमातील कर्मचारी,पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते व वृत्तपत्र टाकणारे कर्मचारी यांना  देखील शासनाने त्वरित विमा जाहीर करावा अशी मागणी रिपब्लिकन संघर्ष दलाचे नेते संजयजी भिमाले व पुणे शहर अध्यक्ष नितीन बालकी यांच्यावतीने करण्यात आली आहे