पुणे प्रवाह न्युज पोर्टल
press release *डॉ आंबेडकर जयंती ला 'वाचन अभिवादन 'करण्याचे आवाहन* *'महिला उत्कर्ष प्रतिष्ठान'चा पुढाकार*
पुणे:
कोरोना विषाणू साथ आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर भारतीय संविधानाचे जनक भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंती दिनी बाहेर पडून जाहीर कार्यक्रम न करता कृतिशील 'वाचन अभिवादन' करून जयंती साजरी करावी,असे आवाहन 'महिला उत्कर्ष प्रतिष्ठान'ने केले आहे. 'महिला उत्कर्ष प्रतिष्ठान'च्या अध्यक्ष उत्कर्षा शेळके यांनी पत्रकाद्वारे हे आवाहन केले आहे.
'डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आपण घराबाहेर पडू शकत नाही,याबद्दल भावनिक होऊ नये. कुणीही घराबाहेर पडू नका,गर्दी करू नका.शासनाच्या आदेशाचे पालन करणे म्हणजेच संविधानाचा आदर राखणे होय. १४ एप्रिल या डॉ आंबेडकर यांच्या जयंती दिनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची स्वलिखित,इतर लेखकांची त्यांचा जीवनकार्यावरील ग्रंथ आपण आपल्या घरीच थांबून अभ्यासावे,सोशल मीडियावरून या विचारांचा प्रसार करावा,सोशल डिस्टन्स ठेवून सॅनिटायझर -मास्क,अन्नाचे चे गरजूना वाटप करावे,मुख्यमंत्री निधीला मदत करावी असे उत्कर्षा शेळके यांनी या पत्रकात म्हटले आहे. ------------------------------------