पुणे विभागात 64 हजार स्थलांतरित मजुरांची सोय*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*पुणे विभागात 64 हजार स्थलांतरित मजुरांची सोय*


*1 लाख 18 हजार मजुरांना भोजन*


  *- विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर* 


            पुणे, दि.5: सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 114 कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 571 कॅम्प असे  पुणे विभागात एकुण 685 रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये 64 हजार 32 स्थलांतरित मजूर असून 1 लाख 18 हजार 312 मजुरांना भोजन देण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.


            पुणे विभागातील गरजू तसेच रोजंदारीवर असलेल्या नागरिकांना सामाजिक संस्था, सेवाभावी संस्थांकडून तसेच दानशूर व्यक्तींकडून दहा जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यासाठी यंत्रणा उभारण्याच्या सूचना विभागातील सर्व जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांना दिल्या आहेत, अशी माहिती डॉ. म्हैसेकर यांनी दिली.


0000



दि.5/4/2020 दुपारी 3.00 वाजता


Popular posts
रॉयल तष्ट आयोजित अभिनेत्री अभिज्ञा भावेचा लग्न सोहळा धूमधडाक्यात संपन्न !* *जेवणाबरोबरच अभिज्ञा भावेच्या लग्नातील कपड्यांचेही कौतुक!*
वाहनांसाठी आकर्षक व पसंतीच्या क्रमांकासाठी* *अर्ज करण्याचे आवाहन*
लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांनी दक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला भेट दिली
*कला प्रदर्शनातून गरजू रुग्णांसाठी निधी संकलन*   _"स्पाईन फाऊंडेशन"च्या वतीने दिनांक १८ व १९ जानेवारी रोजी घोले रोड येथे प्रदर्शन_
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान