लॉकडाऊन काळात रमझान महिन्याचे नमाज पठण घरातच करावे*              

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


प्रेस नोट 
*लॉकडाऊन काळात रमझान महिन्याचे नमाज पठण घरातच करावे*                                                      ------------------                                                                                                                                 *डॉ. पी.ए. इनामदार यांचे आवाहन* 
पुणे :
कोरोना विषाणू साथीमुळे उद्भवलेल्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर २५ एप्रिल पासून सुरु होणाऱ्या मुस्लिम धर्मियांच्या  पवित्र रमझान महिन्यात लॉकडाऊन आणि सामाजिक अंतराच्या मार्गदर्शक  तत्वांचे काटेकोरपणे पालन करत,घरात राहूनच नमाज अदा करणे आणि इतर धार्मिक विधी करण्याचे आवाहन महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी(आझम कॅम्पस)चे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार यांनी  केले आहे.
आज पत्रकाद्वारे त्यांनी हे आवाहन केले. 
कोरोना साथी चे आव्हान लक्षात घेत देशभरातील देवळे, मशिदी, गुरुद्वारा, चर्च आणि इतर धार्मिक ठिकाणांची सर्व धार्मिक कार्ये रद्द करण्यात आली आहेत. लॉकडाऊन आणि सामाजिक अंतराच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे.रमजानच्या पवित्र महिन्यात लॉकडाऊन आणि सामजिक अंतराच्या नियमांची काटेकोरपणे आणि प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी या धार्मिक आणि सामाजिक संस्था तसेच व्यक्तींना स्थानिक प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे,असे डॉ.पी.ए.इनामदार यांनी म्हटले आहे.    


 प्रशासन,धार्मिक-सामाजिक संस्थाच्या स्वयंप्रेरित, प्रभावी आणि सकारात्मक प्रयत्नांमुळेच देशभरातील मुस्लिम बांधवानी 8 आणि 9 एप्रिल रोजी घरात राहूनच नमाज आणि इतर धार्मिक विधी पार पाडत शब-ए-बारात पाळली .कोरोना साथीमुळे उद्भवलेली आव्हाने लक्षात घेत, भारतीय मुसलमानांनी शब-ए-बारातच्या प्रसंगी लॉकडाऊन आणि सामाजिक अंतराच्या नियमांची काटेकोरपणे आणि प्रभावीपणे अंमलबजावणी केली हे कौतुकास्पद आहे,असेही  डॉ. इनामदार यांनी या  पत्रकात म्हटले आहे.                                                                                               --------------------------------------------